भारतीय फुटबॉल महासंघाच्या अर्थ समिती उपाध्यक्षपदी मालोजीराजे, महिला समिती सदस्यपदी मधुरिमाराजे
By सचिन भोसले | Updated: September 19, 2022 16:34 IST2022-09-19T16:34:05+5:302022-09-19T16:34:36+5:30
कोल्हापूरला असा बहुमान प्रथमच मिळला.

भारतीय फुटबॉल महासंघाच्या अर्थ समिती उपाध्यक्षपदी मालोजीराजे, महिला समिती सदस्यपदी मधुरिमाराजे
कोल्हापूर : अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या अर्थ समितीच्या उपाध्यक्षपदी व स्पर्धा समिती सदस्यपदी मालोजीराजे छत्रपती यांची निवड झाली. याशिवाय १७ वर्षा खालील मुलींच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतर्गत महाराष्ट्रात होणाऱ्या सामन्यांसाठी महासंघाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. कोल्हापूरला असा बहुमान प्रथमच मिळला.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची कोलकत्ता येथे अध्यक्ष कल्याण चौबे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीत विविध समित्यांची निवड करण्यात आली. महत्त्वाची असणारी अर्थ समितीच्या उपाध्यक्षपदी वेस्टन इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजेंची निवड करण्यात आली. याच बैठकीत के.एस.ए.च्या पेट्रन मधुरिमाराजे यांनी महाराष्ट्राच्या फुटबॉल क्षेत्रात केलेल्या कार्याची विशेष नोंद घेऊन त्यांची एआयएफएफ महिला समिती सदस्या म्हणून पुन्हा एकदा निवड करण्यात आली.
यासाठी के.एस.ए. चे पेट्रन-इन्-चीफ् शाहू छत्रपती व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.