ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या सदस्यपदी मालोजीराजेंची निवड
By सचिन भोसले | Updated: September 2, 2022 16:18 IST2022-09-02T15:56:04+5:302022-09-02T16:18:43+5:30
कोल्हापूर : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन उपाध्यक्ष व कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांची ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या ...

ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या सदस्यपदी मालोजीराजेंची निवड
कोल्हापूर : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन उपाध्यक्ष व कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांची ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली.
फिफाने ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कार्यकारिणी काही दिवसांपूर्वी बरखास्त केली होती. सलग बारा वर्षे अध्यक्षपदी खासदार प्रफुल पटेल होते. ते महाराष्ट्राचे सलग सोळा वर्षे महासंघावर प्रतिनिधित्व करीत होते. यंदा मात्र मालोजीराजे यांना महाराष्ट्रातून एकमेव उमेदवार म्हणून सर्व जिल्हा संघटनांनी अनुमोदन दिले. त्यामुळे महाराष्ट्रातून मालोजी राजे यांची सदस्यपदी निवड झाली.
ते गेली दहा वर्षे वेस्ट इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.