करवीर पंचायत समिती सभापतीची २९ जुलैला निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:17 IST2021-07-21T04:17:01+5:302021-07-21T04:17:01+5:30

करवीर पंचायत समिती सभापतीपदाची निवड गुरुवारी २९ जुलैला होणार आहे. या निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नुकताच जाहीर ...

Election of Karveer Panchayat Samiti Chairman on 29th July | करवीर पंचायत समिती सभापतीची २९ जुलैला निवड

करवीर पंचायत समिती सभापतीची २९ जुलैला निवड

करवीर पंचायत समिती सभापतीपदाची निवड गुरुवारी २९ जुलैला होणार आहे. या निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नुकताच जाहीर केला.

नेत्यांनी ठरवून दिलेला कार्यकाल संपल्याने पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी भगवान पाटील यांनी पदाचा राजीनामा नुकताच दिला आहे. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी हे पद आरक्षित आहे.

२९ जुलैला सकाळी ११ ते १ या वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे असून दुपारी २ वाजता निवडीचा कार्यक्रम होणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील गटाच्या मंगल आनंदराव पाटील (नेर्ली) यांना सभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Election of Karveer Panchayat Samiti Chairman on 29th July