corona virus : 'त्यांना' श्वास घ्यायला त्रास होत होता, पण 'कोरोना' नव्हता; मृत्यूचं कारण वेगळंच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 14:01 IST2020-03-16T13:11:27+5:302020-03-16T14:01:04+5:30
नागांव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये राहत असलेला ज्येष्ठ नागरीकाचा (मुळचा राहणार हरियाना) रविवारी सीपीआरमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता, मात्र हा मृत्यू कोरोनो व्हायरस सदृष्य आजाराने झाला असल्याची चर्चा नातेवाईकात सुरु होती, परंतु फुफ्फुसाच्या विकारामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल पुण्यातून मिळाल्याने कोल्हापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे.

corona virus : 'त्यांना' श्वास घ्यायला त्रास होत होता, पण 'कोरोना' नव्हता; मृत्यूचं कारण वेगळंच!
कोल्हापूर : नागांव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये राहत असलेला ज्येष्ठ नागरीकाचा (मुळचा राहणार हरियाना) रविवारी सीपीआरमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता, मात्र हा मृत्यू कोरोनो व्हायरस सदृष्य आजाराने झाला असल्याची चर्चा नातेवाईकात सुरु होती, परंतु फुफ्फुसाच्या विकारामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल पुण्यातून मिळाल्याने कोल्हापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे.
नागाव येथील मयत ज्येष्ठ नागरीक (वय ६८) हे कामानिमित्त पुणे, मुंबई आणि हरियाना येथे टॅक्सी, ट्रव्हल्सने प्रवास करत होते. नेहमी प्रमाणे ते कामानिमित्त ८ मार्चला हरियानाला गेले, ते १२ मार्चला कोल्हापुरात दाखल झाले.
प्रकृती खराब झाल्यामुळे १४ मार्च रोजी त्यांना ख़ासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, श्वसनाचा त्रास वाढल्याने १५ मार्चला नातेवाईकांनी अखेर पुढील उपचारासाठी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले.
रविवारी दुपारी त्यांची तब्येत खालवल्याने सीपीआरमधील आयोसोलेशन वॉर्डमधील व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. दुपारी त्याचा उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांमध्ये कोरोना सदृष्य व्हायरसने त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा होती.
या रुग्णास पूर्वीपासून असलेला जुना फुफ्फुसाचा आजार कोल्हापूरमध्ये आल्यानंतर बळावाल. श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या घशातील नमुने पुणे येथील एनवायव्ही विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांच्यावर सीपीआरमध्ये व्हेन्टीलेटरच्या सहाय्याने उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला.
कोरोन संशयित रुग्ण या व्याख्येत हा रुग्ण बसत नसल्यामुळे एनआयव्ही, पुणे या संस्थेने या रुग्णाच्या स्वेबच्या नमुन्याची तपासणी करण्याची आवश्यकता नसल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे हा रुग्ण कोरोना (कोव्हड १९) संशयित नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. संबंधित रुग्णाला जुना फुफ्फुसाचा विकारामुळे झाल्याचेही प्रशासनाने कळविले आहे.