शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

Kolhapur: घराच्या डागडुजीसाठी साहित्य आणून ठेवले, नवऱ्यासाठी चहा बनवतानाच अंगावर भिंत कोसळून वृद्धेला मृत्यूने गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:25 IST

गडहिंग्लज : पावसात बकरी चारून गारठलेल्या नवऱ्याला चहा बनवताना अंगावर दगड-मातीची भिंत कोसळून गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू ...

गडहिंग्लज : पावसात बकरी चारून गारठलेल्या नवऱ्याला चहा बनवताना अंगावर दगड-मातीची भिंत कोसळून गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जनाबाई संतू पाटील (वय ६५, रा. कडाल) असे तिचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे गडहिंग्लज तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून घराचेही साडेचार लाखांचे नुकसान झाले आहे.अधिक माहिती अशी, कडाल येथे संतू बापू पाटील हे वीटा-मातीच्या दोन खोल्यांच्या जुन्या घरात पत्नी जनाबाईसह राहतात. परंतु, महिनाभरातील पावसामुळे घराची पूर्वेकडील भिंत कमकुवत झाली होती. त्यामुळे शेजारील यशवंत पाटील यांच्या घरात तात्पुरते रहायला जाणार होते.आपल्या घराच्या डागडुजीसाठी पत्रे व लोखंडी अँगल इत्यादी साहित्य आणून दारात ठेवले होते. पाऊस वाढल्यामुळे घरातील प्रापंचिक साहित्य पाण्याच्या ढकलगाड्यातून हलवायला सुरुवात केली होती. भांडी-कुंडीसह काही साहित्य अद्याप जुन्या घरातच होते.दरम्यान, सोमवारी बकरी चारायला गेलेले संतू हे सायंकाळी घरी परतले. त्यांच्यासाठी चहा बनविताना पाठीमागची भिंत अचानक त्यांच्या अंगावर कोसळली. मातीच्या कच्या विटांच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्यामुळे त्यांच्या दोन्ही पायाला, हातांना, छातींना व डोक्याला गंभीर दुखापत झाली.आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर रात्री पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, जावई असा परिवार आहे.

वृद्धापकाळातील आधार हरपलाजनाबाईचे पती संतू हे गिरणी कामगार आहेत. संपामुळे मिल बंद पडल्यामुळे ते मुंबईहून गावी आले. शेतीबरोबरच चार बकरीही त्यांनी पाळल्या होत्या. एकमेकांच्या आधाराने वृद्धापकाळ व्यथित करताना काळाने त्यांचा आधार हिरावून घेतला.

पाय तुटल्याने अत्यवस्थ३ फूट रुंदीची भिंत छतापासून कोसळल्यामुळे मोठा आवाज झाला. त्यामुळे धावून गेलेले पोलिस पाटील, तानाजी पाटील, सयाजी पाटील, शिवाजी पाटील यांनी पत्र्याचा ट्रंक व मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जनाबाईंना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी पाठवले. परंतु, गुडघ्याखालील पाय तुटल्यामुळे मोठा रक्तस्त्राव होऊन त्या अत्यवस्थ बनल्या होत्या.