Eight thousand business notices - without notice to the eight thousand professionals on the commercial radar | आठ हजार व्यावसायिकांना नोटीस --विनापरवाना व्यावसायिक रडारवर आठ हजार व्यावसायिकांना नोटीस
आठ हजार व्यावसायिकांना नोटीस --विनापरवाना व्यावसायिक रडारवर आठ हजार व्यावसायिकांना नोटीस

ठळक मुद्दे१५० व्यापाऱ्यांचा समावेश : लॉज, यात्री निवासांवर करडी नजर

कोल्हापूर : शहरातील विना परवाना व्यवसाय करणारे व्यापारी महापालिकेच्या रडारवर आहेत. अशा व्यावसायिकांचा शोध घेऊन त्यांची व्यवसाय सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. महापालिकेने आतापर्यंत परवाना नूतनीकरण केले नसलेल्या आणि विनापरवाना व्यवसाय करणा-या आठ हजार व्यावसायिकांना नोटीस बजावली असून, यामध्ये १५० व्यावसायिक विनापरवाना असणारे आहेत. लॉज, यात्री निवास यांचा यामध्ये समावेश आहे.

 

कोल्हापूर शहरामध्ये अनेक व्यावसायिकांनी महापालिकेचे परवाने घेतलेले नाहीत. गल्ली-बोळांमुळे खुलेआम व्यवसाय केला जात असून, याची नोंद मात्र होत नाही. यामध्ये यात्री निवास, लॉज यांची संख्या सर्वाधिक आहे. शहराच्या मध्यवस्तीमध्ये अशा प्रकारे मोठ्या संख्येने व्यवसाय सुरू आहेत. विशेषत: अंबाबाई मंदिर परिसरातील गल्ली-बोळांत यात्री निवासाचा सुळसुळाट आहे. असे विनापरवाना व्यावसायिक भाविकांकडून वारेमाप भाडे घेतले जाते. मात्र, महापालिकेचा परवाना घेतला जात नाही. तसेच काही यात्री निवासमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठीची यंत्रणाही उपलब्ध ठेवलेली नाही. अशा व्यावसायिकांवर महापालिकेच्या परवाना विभागाने कारवाईचा धडका लावला आहे.
 

 • महापालिकेकडे नोंद असणारे व्यावसायिक : ११७२0
 • बंद झालेले व्यवसाय-१७३0
 • दुबार नोंद-२८२
 • परवाना विभागास वसुलीस पात्र व्यापारी-९२0८
 • नोटीस बजावलेले एकूण व्यावसायिक-८000
 • विना परवाना व्यावसायिक-सुमारे १000
 • विना परवाना व्यावसायिकांना नोटीस-१५0
 • व्यवसाय सील केलेले व्यापारी-२५
 • परवाना फी- ५00 ते २0 हजार रुपये (व्यवसायानुसार)

  फायर आॅडिटची सक्ती
  लॉज, यात्री निवास, हॉस्पिटल, मॉल, आदी व्यवसायांना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय परवाना दिला जात नाही. त्यांच्याकडून फायर आॅडिटची सक्ती करण्यात येते. ही यंत्रणा खर्चिक असल्याने व्यावसायिक यंत्रणा बसवीतही नाहीत आणि परवानाही घेत नाहीत. त्यामुळे भाविकांच्या जिवाशी खेळणाºयांवर महापालिकेकडून कारवाईचा धडका सुरू आहे.

  पार्किंगचा बोजवारा
  अनेक व्यावसायिकांनी महापालिकेसह संबंधित शासकीय कार्यालयाकडे व्यवसायाची नोंद केलेली नाही. कराचा बोजा पडू नये म्हणून त्यांच्याकडून हा प्रकार सुरू आहे. यात्री निवासांचा यामध्ये सर्वाधिक समावेश आहे. गल्लीबोळांमध्ये यात्री निवास सुरू करण्यात आली असून, पार्किंगची सोय नसल्यामुळे सर्व वाहने रस्त्यावरच लावली जात आहेत. परिणामी वाहतुकीची कोंडी होत आहे.

   

  नूतनीकरण केले नसलेल्या आणि विना परवाना व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. परवाना नूतनीकरण केले नसलेल्या २५ व्यापाºयांचे गाळे सील केले आहेत. तसेच विना परवाना व्यवसाय करणाºया २५ लॉज, यात्री निवासांना अंतिम नोटीस बजावली आहे. त्यांनी सात दिवसांत परवाना घेतला नाही तर त्यांचे व्यवसाय सील करण्यात येणार आहे.
  राम काटकर, परवाना अधीक्षक, महापालिका

  Web Title: Eight thousand business notices - without notice to the eight thousand professionals on the commercial radar

  Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.