डीवायपी आर्किटेक्चरचे आठ विद्यार्थी विद्यापीठाच्या टॉप टेनमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST2021-03-24T04:23:22+5:302021-03-24T04:23:22+5:30
शिवाजी विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या 'बॅचलर ऑफ आर्किटेक्चर' अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, कसबा बावडा ...

डीवायपी आर्किटेक्चरचे आठ विद्यार्थी विद्यापीठाच्या टॉप टेनमध्ये
शिवाजी विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या 'बॅचलर ऑफ आर्किटेक्चर' अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे तब्बल ८ विद्यार्थी 'टॉप टेन' मध्ये झळकले आहेत.
शिवाजी विद्यापीठातर्फे २०२० मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. महाविद्यालयाच्या साकिब मुल्ला याने गुणवत्ता यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या १० विद्यार्थ्यांमध्ये महविद्यालयाच्या ८ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे. यामध्ये सिद्धार्थ वझे (तिसरा), मेघा कुपेकर (चौथी), वृंदा सावंत (पाचवी), सोनाली ढगे व अनुजा जगताप (सातवी), अभिषेक नाईक आणि राजवर्धन कामिरे (नववा) यांनी यश मिळवले आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय डी. पाटील, उपाध्यक्ष व गृहराज्यमंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, आर्किटेक्चर विभागाचे अधिष्ठाता प्रा. आर. जी. सावंत, विभागप्रमुख प्रा. आय. एस. जाधव यांनी अभिनंदन केले आहे.