शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात ईदची रक्कम पूरग्रस्तासाठी, गडहिंग्लजला पूरग्रस्तांना शिरकुर्मा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 17:21 IST

आजरा शहरात पावसामुळे प्रत्येक गल्लीतील मस्जीदीमध्ये नमाज पठण करण्यात आले. महापुराच्या अस्मानी संकटामुळे यंदा ईद साधेपणाने साजरी करण्यात आली. अनावश्यक खर्च टाळून पूरग्रस्तासाठी रोख रक्कम जमा करण्यात आली.

ठळक मुद्देआजऱ्यात ईदची रक्कम पूरग्रस्तासाठीगडहिंग्लजला पूरग्रस्तांना शिरकुर्मा वाटप

आजरा : आजरा शहरात पावसामुळे प्रत्येक गल्लीतील मस्जीदीमध्ये नमाज पठण करण्यात आले. महापुराच्या अस्मानी संकटामुळे यंदा ईद साधेपणाने साजरी करण्यात आली. अनावश्यक खर्च टाळून पूरग्रस्तासाठी रोख रक्कम जमा करण्यात आली.दरवर्षी इदगाह मैदानामध्ये बकरी ईदनिमित्त सर्व मुस्लिम बांधव एकत्र येवून ईदगाह मैदानावर नमाज पठण करतात. मात्र, महापुरामुळे यावेळी प्रत्येक गल्लीतील मस्जीदीमध्ये नमाज पठण करण्यात आले. नाईक गल्लीतील मरकज मशिदीमध्ये खुतबा पठण फिरोज चाँद यांनी तर नमाज पठण रहेमान कांडगांवकर यांनी केले. यावेळी पूरग्रस्तांसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी लाखो रूपयांची मदत पूरग्रस्तासाठी जमा करण्यात आली.गडहिंग्लजला पूरग्रस्तांना शिरकुर्मा वाटपगडहिंग्लज  येथील सुन्नी जुम्मा मस्जिदतर्फे शहरातील मुस्लिम बांधवांनी अत्यंत साधेपणाने बकरी ईद साजरी केली. मरकज मस्जीद व गांधीनगरमधील पॅव्हेलियन येथे सामुदायिक नमाज व खुतबा पठण मौलाना मेहमूद रजा, मौलाना फईम मुल्ला व नदीम बाबा शेख यांनी केले.यावेळी पूरग्रस्तांवरील अस्मानी संकट दूर व्हावे व पूर्ववत परिस्थिती सुरळीत होवून समृद्धी यावी यासाठी विशेष सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर गळाभेट घेवून समाज बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास अध्यक्ष राजूभाई खलिफ, सचिव आशपाक मकानदार, एम. एस. बोजगर, इर्षाद मकानदार आदींसह दादा जे ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते. युनूस नाईकवाडे यांनी आभार मानले.दरम्यान, महापुरामुळे बाधित झालेल्या नदीवेस परिसरातील पूरग्रस्तांचे शहरातील म. दुं. श्रेष्ठी विद्यालय, काळू मास्तर विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालयात स्थलांतर करण्यात आले आहे. याठिकाणी आश्रयाला असणाºया पूरग्रस्तांना मुस्लिम बांधवांनी शिरकुर्मा देवून ईद साजरी केली.यावेळी इम्रान मुल्ला, शकील जमादार, अमजद मीरा, वासिम वाटंगी, आफताब नदाफ, आयुब सय्यद, समीर खडकवाले, इरफान मुजावर, समीर राऊत, जीया उटी, शाहरुख जिनाबडे, आशपाक किल्लेदार, मुश्ताक मकानदार, इकबाल नणंदीकर, रियाज काझी, जाफर तपकिरे, इरशाद चिंचलीकर, हसन पेंटर यांच्यासह लकी गु्रपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :Bakri Eidबकरी ईदKolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर