शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वांगी १२०, टोमॅटो १००, भेंडी ८०, बटाटा ५० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 21:40 IST

लॉकडाऊन सोमवारपासून कडक होणार असल्याने लोकांची सलग दुसऱ्या दिवशी रविवारी भाजीपाला, धान्य खरेदीसाठी मंडईमध्ये गर्दी उसळली. आवक तेवढीच व प्रत्येकाने जास्त भाजीपाला खरेदी केल्याने त्याचे दरही गगनाला भिडले. वांगी व श्रावण घेवडा १२० रुपये, टोमॅटो १००, भेंडी ८० रुपये तर बटाटा ५० रुपये किलोने विक्री झाली. लोकांनीही कोणतेही कुरकुर न करता मिळेल ती भाजी खरेदी केली. सोशल डिस्टन्सिंग, कोरोनापासून संरक्षण या गोष्टी गर्दीत वाहून गेल्या.

ठळक मुद्देवांगी १२०, टोमॅटो १००, भेंडी ८०, बटाटा ५० रुपये किलोलॉकडाऊन होणार असल्याने भाजीपाला कडाडला : दुपारीच झाली सगळी विक्री

कोल्हापूर : लॉकडाऊन सोमवारपासून कडक होणार असल्याने लोकांची सलग दुसऱ्या दिवशी रविवारी भाजीपाला, धान्य खरेदीसाठी मंडईमध्ये गर्दी उसळली. आवक तेवढीच व प्रत्येकाने जास्त भाजीपाला खरेदी केल्याने त्याचे दरही गगनाला भिडले. वांगी व श्रावण घेवडा १२० रुपये, टोमॅटो १००, भेंडी ८० रुपये तर बटाटा ५० रुपये किलोने विक्री झाली. लोकांनीही कोणतेही कुरकुर न करता मिळेल ती भाजी खरेदी केली. सोशल डिस्टन्सिंग, कोरोनापासून संरक्षण या गोष्टी गर्दीत वाहून गेल्या.प्रत्येक रविवारी आठवड्याची भाजी खरेदी करणारा मोठा वर्ग आहे. रविवारी सकाळी लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, ऋणमुक्तेश्वर परिसर, शिंगोशी मार्केट, पाडळकर मार्केट येथे लोक भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या संख्येने जातात. लॉकडाऊन एक आठवड्याचाच आहे परंतु केवळ भीतीपोटी लोक खरेदीसाठी जास्त संख्येने बाहेर पडले. शनिवारी बहुतांशी लोकांनी कडधान्ये व इतर आवश्यक धान्याची खरेदी केली व रविवारी भाजीपाला खरेदी केला.

सकाळी कपिलतीर्थ मंडईत तर उभा राहायला जागा नाही असे चित्र दिसत होते. शिल्लक राहिली तर त्या भाजीपाल्याचे उद्या काय करायचे म्हणून व्यापाऱ्यांनी नेहमी लागते तेवढीच भाजी खरेदी केली होती. आणि लोकांनी मात्र नेहमी लागते त्याहून जास्त भाजी खरेदी केली. त्यामुळेच दर गगनाला भिडले. टोमॅटो यंदा वर्षभर फारसा कधी २५ रुपये किलोच्या पुढे गेला नव्हता. लालभडक टोमॅटो अनेक दिवस १० रुपये किलोनेच मिळत होते.

या रविवारी मात्र त्यांने शंभरी ओलांडली. तेवढे पैसे देऊनही बाजारात टोमॅटो मिळत नव्हता. श्रावण घेवड्याची आवक कमी होती त्यामुळे तो घेण्यासाठी तर लोकांच्या उड्या पडल्या. इतर भाजीपाल्याचीही स्थिती अशीच होती. मेथीची पेंडी ३० रुपयांवर गेली होती. हिरव्या मिरच्याही ८० रुपयांनी किलो अशा होत्या. ढबू मिरचीचा दरही १२० रुपयांवर गेला होता. पावसाळा सुरु झाल्यापासून दहा रुपयांना दहा लिंबू मिळत होते परंतू त्याचाही दर दहा रुपयांना ५ असा झाला होता.

एका कुटुंबासाठी आठवड्याचा भाजीपाला व अन्नधान्य, फळे खरेदी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला हजार रुपये पुरले नाहीत. मागणी जास्त असल्याने चार पैसे कमी करतोस असेही कुणी विचारत नव्हते. उलट व्यापारी जो दर सांगेल त्या दरांने लोकांनी भाजीपाला खरेदी केली. दुपारनंतर बहुतांशी व्यापाऱ्यांकडील माल संपला होता.उपवासाच्या वस्तूंना मागणीश्रावणही  सोमवारपासूनच सुरु होत आहे. त्यामुळे उपवासाला लागणारी वरी तांदूळ, शाबू ,राजिगरा लाडू, शाबूच्या पापड्या असल्या पदार्थांचीही लोकांनी खरेदी केली.लॉकडाऊनच्या काळात घरी बसून खायला काहीतरी हवे म्हणून लोकांनी चिरमुरे, फुटाणे, खारी शेंगदाणे, लाह्या, विविध प्रकारचे पोहे खरेदीचा सपाटाच लावला. त्यामुळे अशा दुकानांसमोरही लोकांनी गर्दी केल्याचे दिसत होते.पावसाने उसंतशनिवारी व रविवारी दिवसभर पावसाने चांगलीच उसंत दिली. त्यामुळे लोकांना हवी तशी खरेदी करता आली. दिवसभर पाच-सहा पिशव्यांचे ओझे घेवून घरी परतणारे लोक शहरांत दिसत होते.फळांना मागणीश्रावणात विविध उपवास असल्याने केळी,पपई, पेरू, तोतापुरी आंबे यांचीही विक्री मोठ्या प्रमाणात झाली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारkolhapurकोल्हापूर