शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

दिव्यांगांच्या योजनांची शासनाकडून प्रभावी अंमलबजावणी : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 17:16 IST

                                     

ठळक मुद्दे दिव्यांगांच्या योजनांची शासनाकडून प्रभावी अंमलबजावणी : रामदास आठवलेकोल्हापूर जिल्हा परिषदेत दिव्यांगांसाठीचे साहित्य वितरण

कोल्हापूर :  दिव्यांगांना बळ देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे महत्वाचे आहे. यासाठी  शासनाने त्यांच्यासाठी सुरु केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीरामदास आठवले यांनी केले. 

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या ‘एल्मिको’च्या माध्यमातून गेल्या सात वर्षांत देशातील ५ लाख १० हजार दिव्यांगांना ४१८ कोटी रुपये खर्चून साहित्य वितरित करण्यात आले आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रतनलाल कटारिया यांनी ही माहिती दिली.कोल्हापूर जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवाजी विद्यापीठामध्ये आयोजित जिल्ह्यातील दिव्यांगांसाठीच्या साहित्य वितरण समारंभामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले होते.

कटारिया म्हणाले, कोल्हापुरातील हे ५७६ वे शिबिर असून यापुढच्या काळात दिव्यांगांना उत्तम दर्जाचे साहित्य देण्यासाठी ‘एल्मिको’ने जर्मनीतील आॅटोबॉक, इंग्लंडमधील मोटिवेशन ट्रस्ट यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबतही सामंजस्य करार केले आहेत.कोल्हापूर जिल्हा परिषदेचा गौरव करून कटारिया म्हणाले, आज या शिबिरामध्ये १० कोटी रुपये खर्च करून १५ हजार ६९५ दिव्यांगांना २३ हजार ४९५ साधने वितरित करण्यात आली आहेत. आपल्याकडे असलेल्या जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून २०२४ पर्यंत देशातील १५ कोटी घरांना ३ लाख ६० हजार कोटी रुपये खर्च करून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.रामदास आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय विभागाला ८५ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, त्यातील ९५० कोटी रुपये दिव्यांगांसाठी खर्च करण्यात येत आहेत. खासदार धैर्यशील माने, जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील यांची यावेळी भाषणे झाली.जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रास्ताविक केले, तर समाजकल्याण समिती सभापती स्वाती सासने यांनी आभार मानले. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, सभापती प्रवीण यादव, हंबीरराव पाटील, डॉ. पद्माराणी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.‘लोकमत’चा उल्लेखखासदार संजय मंडलिक यांनी या दिव्यांगांचे साहित्य पडून असल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर आपण केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर हा कार्यक्रम निश्चित झाल्याचे सांगितले. यापुढच्या काळात वेळेत कार्यक्रम व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Divyangदिव्यांगRamdas Athawaleरामदास आठवलेministerमंत्रीkolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद