शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

दिव्यांगांच्या योजनांची शासनाकडून प्रभावी अंमलबजावणी : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 17:22 IST

दिव्यांगांना बळ देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे महत्वाचे आहे. यासाठी  शासनाने त्यांच्यासाठी सुरु केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.                      

ठळक मुद्दे दिव्यांगांच्या योजनांची शासनाकडून प्रभावी अंमलबजावणी : रामदास आठवलेदिव्यांगांसाठीचे साहित्य वितरण समारंभ

कोल्हापूर :  दिव्यांगांना बळ देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे महत्वाचे आहे. यासाठी  शासनाने त्यांच्यासाठी सुरु केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. 

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या ‘एल्मिको’च्या माध्यमातून गेल्या सात वर्षांत देशातील ५ लाख १० हजार दिव्यांगांना ४१८ कोटी रुपये खर्चून साहित्य वितरित करण्यात आले आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रतनलाल कटारिया यांनी ही माहिती दिली.कोल्हापूरजिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवाजी विद्यापीठामध्ये आयोजित जिल्ह्यातील दिव्यांगांसाठीच्या साहित्य वितरण समारंभामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले होते.

कटारिया म्हणाले, कोल्हापुरातील हे ५७६ वे शिबिर असून यापुढच्या काळात दिव्यांगांना उत्तम दर्जाचे साहित्य देण्यासाठी ‘एल्मिको’ने जर्मनीतील आॅटोबॉक, इंग्लंडमधील मोटिवेशन ट्रस्ट यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबतही सामंजस्य करार केले आहेत.कोल्हापूर जिल्हा परिषदेचा गौरव करून कटारिया म्हणाले, आज या शिबिरामध्ये १० कोटी रुपये खर्च करून १५ हजार ६९५ दिव्यांगांना २३ हजार ४९५ साधने वितरित करण्यात आली आहेत. आपल्याकडे असलेल्या जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून २०२४ पर्यंत देशातील १५ कोटी घरांना ३ लाख ६० हजार कोटी रुपये खर्च करून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.रामदास आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय विभागाला ८५ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, त्यातील ९५० कोटी रुपये दिव्यांगांसाठी खर्च करण्यात येत आहेत. खासदार धैर्यशील माने, जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील यांची यावेळी भाषणे झाली.जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रास्ताविक केले, तर समाजकल्याण समिती सभापती स्वाती सासने यांनी आभार मानले. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, सभापती प्रवीण यादव, हंबीरराव पाटील, डॉ. पद्माराणी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.‘लोकमत’चा उल्लेखखासदार संजय मंडलिक यांनी या दिव्यांगांचे साहित्य पडून असल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर आपण केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर हा कार्यक्रम निश्चित झाल्याचे सांगितले. यापुढच्या काळात वेळेत कार्यक्रम व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर