आजऱ्यातील शिवबाच्या राईचा ‘कडा’ खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 05:15 PM2019-08-12T17:15:54+5:302019-08-12T17:16:53+5:30

आजरा तालुक्यातील वझरेनजीकचा शिवबाच्या राईचा ‘कडा’ भेगा पडून खचल्याने वझरे, खोतवाडी, पेरणोलीपैकी नावलकरवाडीसह भुदरगडचा सीमाभागाला धोका निर्माण झाल्याने या गावातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

The 'edge' of Shiv Baba Rai has fallen | आजऱ्यातील शिवबाच्या राईचा ‘कडा’ खचला

आजऱ्यातील शिवबाच्या राईचा ‘कडा’ खचला

Next
ठळक मुद्देआजऱ्यातील शिवबाच्या राईचा ‘कडा’ खचलावझरे, खोतवाडी, पेरणोलीसह भुदरगड सिमाभागाला धोका

आजरा :आजरा तालुक्यातील वझरेनजीकचा शिवबाच्या राईचा ‘कडा’ भेगा पडून खचल्याने वझरे, खोतवाडी, पेरणोलीपैकी नावलकरवाडीसह भुदरगडचा सीमाभागाला धोका निर्माण झाल्याने या गावातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

भुदरगड व आजरा तालुक्याच्या सीमेलगत २५ ते ३० किलोमीटर लांबीचा व १ हजार फूट उंचीच्या जंगलाने व्यापलेला हा कडा आहे. कड्यावरच्या कांही अंतरावर मैदानी पठार आहे तर कांही भाग घनदाट झाडांनी व्यापला आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती लाभलेल्या कड्याच्या इतिहासात कड्याला प्रथमच धोका निर्माण झाला आहे.

१९८३ नंतर प्रथमच दोन्ही तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील वझरेपैकी खोतवाडीजवळील १ हजार फूट उंच असलेल्या कड्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. पहिल्यांदाच या भेगा नागरिकांना दिसल्याने दोन्ही तालुक्यातील कड्याच्या क्षेत्रातील गावामध्ये भिती पसरली आहे.

कड्याला आडव्या भेगा पडल्या आहेत. भेगा पाच ते सात किलोमीटर अंतरावर पडून कडा खचल्याने खोतवाडी, वझरे व नावलकरवाडी या वस्त्यांना प्राथमिक स्तरावर धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसापासून ग्रामस्थामध्ये घालमेल सुरू आहे. खोतवाडी येथून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर हा कडा आहे. कड्याच्या कांही अंतरावरच खोतवाडी, नालकरवाडी या वस्त्यासह वझरे गाव वसलेले आहे. कड्यावर मोठे दगड व झाडे आहेत.

भेगा मोठ्या प्रमाणात पडत असल्याने दगड, झाडे कोणत्याही क्षणी खाली कोसळू शकतात अशी परिस्थितीत तयार झाली झाली. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

या गावांना आहे धोका

आजरा तालुक्यातील खोतवाडी, वझरे, पेरणोलीपैकी नावलकरवाडी, हरपवडेपैकी धनगरवाडा तर भुदरगड तालुक्यातील मेघोली, मेघोलीपैकी धनगरवाडा, तळकरवाडी या वस्त्या व गावांना धोका पोहचू शकतो.
----------------------------
* प्रशासनाकडून दक्षतेची गरज
तालुक्यात व जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे प्रशासनाचे या घटनेकडे लक्ष गेलेल नाही. दोन्ही तालुक्यातील सीमाभागातील गावांना सतर्कतेसाठी प्रशासनाने दक्ष राहून सतर्कतेचा आदेश देण्याची गरज आहे.
----------------------------
फोटो ओळी : आजरा तालुक्यातील वझरेपैकी खोतवाडी येथील शिवबाची राई’ या कठड्या अशाप्रकारे भेगा पडल्या आहेत. त्यामुळे कठ्यावरील माती व वृक्ष उन्मळून पडत असल्याने या परिसरातील गावांना धोका निर्माण झाला आहे.
क्रमांक : १२०८२०१९-गड-०१/०२

Web Title: The 'edge' of Shiv Baba Rai has fallen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.