शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ED Raid: कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सीईओं’सह पाच अधिकाऱ्यांची तब्बल ७० तासांनंतर सुटका, ‘गोल्ड’ लोनचीही चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 16:11 IST

कारभाराची दोन दिवस ‘ईडी’ने चौकशी करूनही बँकेच्या ठेवीत तब्बल २०० कोटींनी वाढ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह पाच अधिकाऱ्यांची काल, शुक्रवारी रात्री दहा वाजता मुंबईतील ईडी कार्यालयातून ७० तासांच्या चौकशीनंतर सुटका करण्यात आली.ईडीच्या पथकाने बुधवार व गुरुवारी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासह दोन शाखा व संताजी घोरपडे साखर कारखान्याची चौकशी केली. या कालावधीत बँकेचे कामकाज काहीसे विस्कळीत झाले होते. कारभाराची दोन दिवस ‘ईडी’ने चौकशी करूनही बँकेच्या ठेवीत तब्बल २०० कोटींनी वाढ झाली. चौकशी सुरू असतानाही कर्मचाऱ्यांनी बँकेचे कामकाज सुरळीत ठेवले, त्याचबरोबर ठेवीदारांनीही बँकेवरील विश्वास कायम ठेवला. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माने, पत देखरेख विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहायक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर व राजू खाडे यांना गुरुवारी सायंकाळी पुढील चौकशीसाठी ईडीने ताब्यात घेतले. अधिकाऱ्यांना घेऊन पथक गुरुवारी रात्री दीड वाजता ईडीच्या मुंबई कार्यालयात पोहोचले. त्यानंतरही अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. शुक्रवारी दिवसभरही त्यांच्याकडून जबाब नोंदवण्यात आला.सायंकाळी पाचपर्यंत सोडतील, असे बँक वर्तुळात चर्चा होती. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत त्यांना सोडण्यात आले नव्हते. गुरुवारी रात्रीच बँकेच्या अधिकाऱ्यांपाठोपाठ कर्मचारी युनियनचे प्रतिनिधी दिलीप लोखंडे, इंद्रजित घाटगे, अजित पाटील, संजय साबळे हे मुंबईला रवाना झाले. ते शुक्रवारी दिवसभर ईडी कार्यालयाच्या बाहेर थांबून होते.

‘गोल्ड’ लोनचीही केली चौकशीजिल्हा बँकेकडे गोल्ड लोन किती आहे, त्यामध्ये अध्यक्ष हसन मुश्रीफ यांचे किती आहे? याची चौकशीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी केल्याचे समजते.

‘ईडी’चे अधिकारी फेराखाली झोपायचे, मात्र...बुधवारी रात्रभर चौकशी सुरू असताना ‘ईडी’चे अधिकारी दोघे-दोघे जाऊन झोपायचे व पुन्हा तपासणीसाठी यायचे. मात्र, बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांना हलू दिले नसल्याचे सांगण्यात आले.

पोलिस बंदोबस्तात जेवणमुंबईला नेलेल्या पाच अधिकाऱ्यांना शुक्रवारी दुपारी दोन वाजता ईडी कार्यालयातून दोघादोघांना पोलिस बंदोबस्तात जेवणासाठी बाहेर आणले होते.

बँकेच्या अधिकाऱ्यांचे फोन बंदचौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांचे फोन गुरुवारपासून बंद करण्यात आले आहेत. त्यांचा कोणाशीही संपर्क होऊ देत नसल्याने त्यांच्या कुटुंबांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय