अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचे उद्या विद्यापीठात व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:25 IST2021-08-15T04:25:12+5:302021-08-15T04:25:12+5:30

कोल्हापूर : जेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचे उद्या, सोमवारी विद्यापीठात ऑनलाईन व्याख्यान होत आहे. अर्थशास्त्र विभागाच्या वतीने वेबेक्स ...

Economist Dr. Narendra Jadhav's lecture at the university tomorrow | अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचे उद्या विद्यापीठात व्याख्यान

अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचे उद्या विद्यापीठात व्याख्यान

कोल्हापूर : जेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचे उद्या, सोमवारी विद्यापीठात ऑनलाईन व्याख्यान होत आहे. अर्थशास्त्र विभागाच्या वतीने वेबेक्स या प्लॅटफॉर्मवर दुपारी ३ वाजता होणाऱ्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी.शिर्के असतील, असे माहिती विभागाचे प्रमुख ज्ञानदेव तळुले यांनी कळवले आहे.

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने देश-विदेशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, तसेच शास्त्रज्ञाची व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, माजी केंद्रीय मंत्री व जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. वाय. के. अलघ, बँकिंग तज्ज्ञ डॉ. मुकुंदन, अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ हॉवर्ड जोन्स, रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात, गोखले इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. राजस परचुरे, नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात, प्रा. ज्ञानदेव तळुले आदी ‘आर्थिक धोरणे आणि सद्य:स्थिती’ या

विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प डॉ. नरेंद्र जाधव गुंफणार आहेत.

यावेळी प्र- कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, डॉ. यशवंत थोरात उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या वेबसाईटवर सेमिनार आणि वर्कशॉप या मथळ्याखाली लेक्चर सेरीज इन इकॉनॉमिक्स येथे व्याख्यानाची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Web Title: Economist Dr. Narendra Jadhav's lecture at the university tomorrow