शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

आर्थिक मंदी, बेरोजगारीबाबत काँग्रेसतर्फे निवेदन, पूरग्रस्तांच्यावतीनेही केल्या विविध मागण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 16:10 IST

काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली  शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

ठळक मुद्देआर्थिक मंदी, बेरोजगारीबाबत काँग्रेसतर्फे निवेदन पूरग्रस्तांच्यावतीनेही केल्या विविध मागण्या

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या सर्व क्षेत्रांतील गैर व्यवस्थापनामुळे देशात मंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे. बेरोजगारी, महागाई वाढली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि गुन्हेगारीही वाढली आहे. महापुरानंतरही नागरिकांना, शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. या सर्व बाबतीत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली  शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.यावेळी महमंदशरीफ शेख म्हणाले, ‘महाराष्ट्रावर पाच लाख कोटींचे कर्ज असून, त्याचा परिणाम राज्याच्या कारभारावर होत आहे.’ अ‍ॅड. सुरेश कुराडे म्हणाले, ‘केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम उद्योग क्षेत्रावर झाला आहे. शेतीवरही झाला आहे. युती सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यात १४ हजार ६७0 शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.गुलाबराव घोरपडे म्हणाले, अजूनही पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे नीट पंचनामे झाले नाहीत; त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक उद्योगधंदे बंद झाल्याने त्याचा विपरित परिणाम महाराष्ट्रातील युवक, शेतकरी, शेतमजूर तसेच समाजातील गरीब, मागास, अल्पसंख्यांक यांच्यावर होत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.यावेळी सरलाताई पाटील, संपतराव पाटील, किशोर खानविलकर, आर. के. देवणे, संजय पोवार, किरण मेथे, ए. डी. गजगेश्वर, शंकरराव पाटील, विक्रम जरग यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर