शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची भिस्त पर्यायी व्यवस्थेवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 1:32 PM

पर्यावरणपूरक गणेशविसर्जनात राज्यात अव्वल क्रमांकावर असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर यंदा यंत्रणा उभी करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ग्रामसेवकासह महसूल व ग्रामपंचायतीचे कर्मचारी संपावर असल्याने विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षकासह क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर पर्यायी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ठळक मुद्देग्रामसेवकासह महसूल कर्मचारी संपाचा परिणामजिल्हा परिषदेचे पर्यावरणपूरक विसर्जनाचे आवाहन

कोल्हापूर : पर्यावरणपूरक गणेशविसर्जनात राज्यात अव्वल क्रमांकावर असलेल्या कोल्हापूरजिल्हा परिषदेसमोर यंदा यंत्रणा उभी करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ग्रामसेवकासह महसूल व ग्रामपंचायतीचे कर्मचारी संपावर असल्याने विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षकासह क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर पर्यायी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.गेल्या १0 वर्षांपासून कोल्हापूर जिल्हा परिषदेने पर्यावरणपूरक गणेश विसर्जन हा लोकोत्सव व्हावा म्हणून प्रयत्न केले. गेल्या चार-पाच वर्षांत तर त्याला लोकचळवळीचेच स्वरूप आले. अधिकारी, पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी हातात हात घालून प्रत्यक्ष विसर्जन स्थळावर जाऊन लोकांना मूर्ती व निर्माल्य दान करण्यास प्रवृत्त करताना दिसले.

विसर्जनाआधी १५ दिवस याची पूर्वतयारी म्हणून बैठका, जनजागृती करण्यात आली. परिणामी तब्बल दोन लाख ६८ हजार इतक्या घरगुती, तर ७00 सार्वजनिक गणेशमूर्ती दान झाल्या. या उपक्रमाचे राज्यभर कौतुकही झाले; पण यावर्षी याचे नेमके उलटे चित्र दिसत आहे. अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांच्यात आधीपासूनच अनास्था दिसत आहे.

ग्रामपंचायत व स्वच्छता विभागाने आपल्या परीने यंत्रणा लावली आहे; पण त्यांनाही मर्यादा येत आहेत. त्यातच ग्रामसेवकांनी तीन सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. गुरुवारपासून महसूल कर्मचाऱ्यांनीही कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

आशाचेही कामबंद आंदोलन सुरू आहे. गावपातळीवर राबविणारी यंत्रणाच संपावर असल्याने काम करवून घ्यायचे कुणाकडून आणि सूचना, अहवाल मागवायचा कुणाकडून असा मोठा प्रश्न जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला पडला आहे.परिणामी कोणत्याही धार्मिक भावना न दुखावता, कोणतेही जलस्रोत प्रदूषित होणार नाहीत, याची दक्षता घेऊन ग्रामपंचायत स्तरावर निर्माण केलेल्या विसर्जनाच्या पर्यायी व्यवस्थेचा आधार घेऊन गणेश विसर्जन करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.१0२५ ग्रामपंचायतीत ४३८ खणीमध्ये ७१३ काहिलींची व्यवस्था करण्यात आली आहे. निर्माल्य संकलनासाठी ३८९ ट्रॅक्टर-ट्रॉली व ७0४ घंटागाडींचे नियोजन केले आहे. तथापि, हे सर्व नियोजन कागदावरच आहे, प्रत्यक्षात काम करताना पर्यायी व्यवस्था किती राबते, यावरच जिल्हा परिषदेच्या पर्यावरणपूरक विसर्जन मोहिमेचे यशापयश अवलंबून आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर