शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सहजसेवा’ तर्फे यंदाही पोटभर जेवण-: अन्नछत्र १७ पासून; दोन लाख भाविकांना लाभ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 17:59 IST

जोतिबा चैत्र यात्रेत सलग अठरा वर्षे अन्नछत्राची सेवा बजावणाऱ्या सहजसेवा ट्रस्टतर्फे यंदाही १७ ते २० एप्रिलदरम्यान अन्नछत्राचा उपक्रम गायमुख येथे रात्रंदिवस राबविला जाणार आहे.

ठळक मुद्दे जोतिबा यात्रेतील मानवसेवा

कोल्हापूर : जोतिबा चैत्र यात्रेत सलग अठरा वर्षे अन्नछत्राची सेवा बजावणाऱ्या सहजसेवा ट्रस्टतर्फे यंदाही १७ ते २० एप्रिलदरम्यान अन्नछत्राचा उपक्रम गायमुख येथे रात्रंदिवस राबविला जाणार आहे. किमान दोन लाखांहून अधिक भाविक या अन्नछत्राचा लाभ घेतील, अशी माहिती सहजसेवा ट्रस्टचे विश्वस्त सन्मती मिरजे व प्रमोद पाटील यांनी मंगळवारी  पत्रकार परिषदेत दिली.

जोतिबा यात्रा शुक्रवारी (दि. १९) भरत आहे. यात  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, आदी राज्यांतून सहा लाखांवर भाविक यात्रेसाठी येतात. या काळात पाऊस पडला नाही तर किमान दोन लाखांहून अधिक भाविक या अन्नछत्राचा लाभ घेतील, अशी अपेक्षा धरून सर्व नियोजन केले आहे. या अन्नछत्राचा गेल्या अठरा वर्षांत लाखो भाविकांनी लाभ घेतला आहे. यात्राकाळात वळवाच्या पाऊस पडतो, हा अनुभव लक्षात घेता भाविकांची गैरसोय होते, तशीच गैरसोय अन्नछत्रातही होते. त्यामुळे अन्नछत्रासाठी गायमुख येथे १५ हजार चौरस फुटांचा मांडव (लोखंडी फॅब्रिकेटेड नटबोल्टचा) उभारण्यात आला आहे. हा मांडव अनिल काटे यांच्यातर्फे घालण्यात आला आहे. चहा व मठ्ठा तयार करण्यासाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात आला आहे. महिलांच्या अंघोळीसाठी बाथरूमचीही सोय करण्यात आली. अन्नछत्राच्या समोरील मोकळ्या जागेत पार्किंगची सोय करण्यात आली आहे. चैत्र पाडव्यापासून ५० हून अधिक कामगार हा उपक्रम चांगल्या प्रकारे पार पडावा म्हणून राबत आहेत. अन्नछत्रासाठी लागणाऱ्या आरोग्य, जिल्हा प्रशासन, अन्न-औषध प्रशासन, पोलीस दल, आदी सरकारी विभागांच्या लागणाºया सर्व प्रकारच्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या पत्रकार परिषदेस प्रकाश केसरकर, रोहित गायकवाड, मनीष पटेल, चिंतन शहा, चेतन परमार, संकेत पाटील आदी उपस्थित होते. यात्राकाळात जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस दल, आरोग्य विभाग, महावितरण, आपत्कालीन व्यवस्था पाहणाºया स्वयंसेवी संस्था, टू व्हीलर असोसिएशन व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अखंड चार दिवस झटत असतात. त्यांचे कार्य व्यवस्थित पार पडावे याकरिता त्यांना चहा, नाष्टा, जेवण, इत्यादींची सोय ट्रस्टमार्फत करण्यात आली आहे. --------जनावरांचीही सोय जोतिबा यात्रेसाठी जसे भाविक बस, चारचाकी, दुचाकी घेऊन येतात, त्याप्रमाणे आजही बैलगाड्या घेऊन येणाºया भाविकांची संख्या लक्षणीय असते. अन्नछत्रात येणाºया भाविकांच्या पोटाची सोय केली जाते त्याप्रमाणे बैलांचीही काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. ही बाब ध्यानी घेऊन ट्रस्टतर्फे यात्रेकरूंच्या बैलांसाठी उत्तम प्रतीची शेंगदाण्यांची कपरी पेंड, भुस्सा मोफत दिला जातो. यंदा १२०० किलो पेंड व २००० किलो भुस्सा  छोट्या पिशव्यांमधून पुरविला जाणार आहे. याचीही तयारी पूर्ण झाली आहे. --------रक्तदात्यांकरिता वातानुकूलित बसरक्तदानाचे महत्त्व सर्वांना कळावे व त्यासंबंधीची भीती कमी व्हावी, याकरिता २००४ पासून जोतिबा यात्रेत अन्नछत्राच्या चार दिवसांच्या कालावधीत रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. यंदाही हे शिबिर आयोजित केले आहे. याकरिता राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची वातानुकूलित बसमध्ये रक्तदान करण्याची सोय केलेली आहे. गेल्या वर्षी ४६५ युनिट रक्त जमा झाले होते. यंदा ५०० युनिट जमा होणे अपेक्षित आहे. हे जमा झालेले रक्त शासकीय रुग्णालयास दिले जाते.  ----------समाजकार्यातील नवे नेतृत्व गेली अठरा वर्षे सहज सेवा ट्रस्टतर्फे गायमुख येथे जोतिबा यात्रेत येणाºया लाखो भाविकांसाठी अन्नछत्राचे काम अखंड सुरू आहे. यात प्रामुख्याने सन्मती मिरजे व समवयस्क मंडळींची कार्यकारिणी सातत्याने राबत आहे. सुरुवातीच्या काळात पन्नाशीत आलेली ही मंडळी आता सत्तरीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांतील दोन सदस्यांचे निधन झाले आहे. ही सेवा अखंड पुढेही न थांबता सुरू राहावी, याकरिता कार्यकारी मंडळाने यंदा युवा पिढीतील शिलेदारांकडे नेतृत्व दिले आहे. यात रोहित गायकवाड, मनीष पटेल, चिंतन शहा, चेतन परमार, संकेत पाटील यांचा समावेश आहे. मसालेभात..केशरयुक्त शिराजोतिबा यात्रेकरूंसाठी १७ ते २० एप्रिल दरम्यानच्या कालावधीत रात्रंदिवस चहा, मठ्ठाही दिला जातो. जेवणात मसालेभात, केशरयुक्त शिरा, शेवग्याच्या शेंगांची आमटी, बटाट्याची भाजी, वांगी-बटाटा भाजी, लोणचे, कोशिंबीर असे मिष्टान्न पोटभर दिले जाते. जोडीला अ‍ॅक्वागार्डचे शुद्ध, थंड पाणीही दिले जाते.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूर