शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बस चालविणं दुचाकीएवढंच सोपं

By admin | Updated: March 11, 2015 00:06 IST

प्रसन्ना पवार : ड्रायव्हिंगकडे आवड म्हणून पहावे. महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला आहे.

सातारा : ‘एसटी बससारखे मोठे वाहन आपणाला चालवायला जमेल का? हा महिलांमध्ये न्यूनगंड असतो, पण एकदा का आपण वाहन चालविण्याकडे आवड म्हणून पाहिलं तर दुचाकी चालविण्याएवढंच बस चालविणं सोपं आहे,’ असा विश्वास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रसन्ना पवार यांनी दिला आहे.मंगळावर पाऊल ठेवलेली सावित्रीची लेक मात्र एसटीचे स्टेअरिंग हाती घ्यायचं म्हटलं की ‘नको ग बाईऽऽऽ’ म्हणते. महामंडळानेही महिलांसाठी चालक भरतीत २,२५३ जागा राखीव ठेवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी निर्माण झालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रसन्ना पवार ‘लोकमत’शी बोलत होत्या. मोटारसायकलपासून ते ट्रकपर्यंत सर्वप्रकारची वाहने त्या सफाईदारपणे चालवितात. हे वाहन चालविताना येत असलेले अनुभवही त्यांनी ‘लोकमत’शी शेअर केले. पवार म्हणाल्या, ‘सायकल येत असलेल्या प्रत्येक मुलीला मोटारसायकल चालवायला आलं पाहिजे असं वाटत असते. अन् त्या काही दिवसांतच सफाईदारपणे चालवितात. अवजड वाहनांचंही तसंच आहे. अवजड वाहन चालविण्यासाठी हलके वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे. कारसारखे वाहन चालवत असलेल्या कोणत्याही स्त्रीला एसटी बस म्हणजे किरकोळ वाहन वाटायला लागते.’एसटी चालविण्याचा परवाना लगेच मिळत नाही, त्यासाठी चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना काढणे बंधनकारक आहे. त्यानंतर अवजड वाहन चालविण्याचा परवाना मिळतो. महिलांना मुळात भीती असते ती गाडीच्या लांबीची. ती भीती संपली की झालं. त्यासाठी मनानं भक्कम असणं आवश्यक आहे,’ असेही पवार म्हणाल्या. (प्रतिनिधी)