शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

भूकंप उशाला; चिंता कशाला?, कोयनेच्या विनाशकाली भूकंपाला ११ डिसेंबर २०१७ ला ५० वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:52 AM

कोयनेच्या विनाशकाली भूकंपाला ११ डिसेंबर २०१७ ला ५० वर्षे होत आहेत. खरं तर हा दु:खाचा प्रसंग आहे. पण, त्या निमित्ताने भूकंपाखाली ज्यांना जिवाला मुकावे लागले त्यांना विनम्र श्रद्धांजली

आनंद परांजपे, कऱ्हाड

कोयनेच्या विनाशकाली भूकंपाला ११ डिसेंबर २०१७ ला ५० वर्षे होत आहेत. खरं तर हा दु:खाचा प्रसंग आहे. पण, त्या निमित्ताने भूकंपाखाली ज्यांना जिवाला मुकावे लागले त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहून भूकंपाबाबतचा आढावा घेणारा लेख...कोयना परिसर ११ डिसेंबर १९६७ पहाटे ४ वा. २१ मि.नी भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरून गेला. यामध्ये शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. निसर्गाच्या या उद्रेकाला येत्या ११ डिसेंबर २०१७ ला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पन्नास वर्षांत कºहाड, कोयना परिसरातील जनतेने १ लाख २० हजार २९० भूकंपाचे धक्के नुसते सोसले नव्हे, तर येथील जनता भूकंप उशाला घेऊन झोपत आहे. गेल्या ५० वर्षांत ६ रिश्टर स्केलच्या वरचे ९ धक्के, ५ रिश्टर स्केलच्या वरचे ९६ धक्के, तर ४.०० रिश्टर स्केलच्या वरचे १६४६ धक्के या परिसराला बसले. खरं तर भूकंपाच्या धक्क्याने जमीन हादरू लागली की, लोक विनाकारण धावाधाव करतात व या गडबडीत दुर्घटना होण्याची शक्यता असते. अशावेळी काय करावे याची माहिती भूकंपप्रवण भागातील लोकांना मिळायला हवी. त्याचप्रमााणे स्वत:च्या घराबद्दल असलेली अतिरेकी ओढ यामुळे लोक स्थलांतराला तयार नसतात. त्यांचे प्रबोधन व पुनर्वसनही होणे गरजेचे आहे.कोयना प्रकल्पाच्या उभारणीची बीजे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून रुजलेली आहेत. १९०० मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळानंतर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी धरण बांधण्याच्या संकल्पनेनेच एच.एफ. बील या इंग्रज अभियंत्याने १९०१ मध्ये सर्वेक्षण केल्याचे आढळते. १९१० साली टाटा वीज कंपनीने या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले होते. महाराष्ट्रातील वाढती विजेची मागणी लक्षात घेता १९४५ मध्ये तत्कालीन मुंबई राज्याच्या इलेक्ट्रिक ग्रीड डिपार्टमेंटने सर्वेक्षण व नियोजनाचे काम हाती घेतले. पुढे या कामास १९५३ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली व १९ जानेवारी १९५४ ला कामाचा प्रारंभ झाला, तर संपूर्ण काम १९६५ मध्ये पूर्ण करण्यात आले.कोयना धरणाचे बांधकाम करण्यापूर्वी किंवा चालू असताना संपूर्ण दक्षिण भारताचा परिसर भूकंपमुक्त म्हणून ओळखला जात होता; परंतु हे ११ डिसेंबर १९६७ ला कोयना येथे झालेल्या ६.८ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाने खोटे ठरविले. या भूकंपामुळे धरणाच्या अनुत्सारित भागांना व अनुषंगिक कामांना नुकसान पोहोचले होते. मात्र, सांडवा भागाचे कोणतेही नुकसान झालेले दिसून आले नाही. त्यामुळे कोयना धरण हे भविष्यात अशा प्रकारच्या भूकंपांशी सामना करण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने मजबूत करण्याचे ठरले. कोयना धरण सांडवा मजबुतीकरणाचे काम हे जरी पारंपरिक पद्धतीचे असले, तरी दोन पावसाळ्यांमधील उपलब्ध वेळ, मूळ धरण, वीजगृह व इतर बांधकामांची सुरक्षितता, प्रकल्पाच्या सर्व घटकांना कार्यरत ठेवून विशिष्ट वेळेत सर्वचकाम पूर्ण करणे बंधनकारक असल्यामुळे हे काम वैशिष्ट्यपूर्ण ठरले.कोयना धरण सांडवा मजबुतीकरणाच्या कामामध्ये पायाचे खोदकाम करताना धरण व पायथा विद्युतगृह यांना कोणताही धोका पोहोचणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात आली. हे खोदकाम नियंत्रित विस्फोटन पद्धतीने केले. या पद्धतीच्या विस्फोटाचा अभ्यास करण्यात येऊन त्यांच्या मार्गदर्शक प्रणालीनुसारच कार्यक्षेत्रावर काम पूर्ण करण्यात आले. धरण व विद्युतगृह यांना बसणारे प्रत्यक्ष हादरे (प्रवेग) मोजण्यासाठी दोन्ही ठिकाणी ‘मिनिमेट’ नावाची अद्ययावत उपकरणे बसविली होती. धरणासाठी ७० मि.मी. /सेकंद व विद्युतगृहासाठी १० मि.मि./सेकंद इतका महात्तम प्रवेग निश्चित करण्यात आला होता; परंतु एकूण घेतलेल्या सुमारे ९०० स्फोटांमध्ये धरणाजवळ ३० ते ३५ मि.मि./सेकंद व विद्युतगृहात २.५ मि.मि./सेकंद यापेक्षा जास्त तीव्रतेची नोंद झालेली नाही.संपूर्ण कामामध्ये संधानकाचे काम हे प्रमुख व वैशिष्ट्यपूर्ण होते. मजबुतीकरणाच्या कामामध्ये प्रामुख्याने तीन प्रकारच संधानकाचा समावेश आहे.१) मजबुतीकरणाचे संधानक२) बुजवणीचे संधानक३) उतरणीचे संधानककोयना धरणाच्या संधानकाचे मिश्रण संकल्पन हे आय.आय.टी., मुंबई या संस्थेकडून तयार करण्यात आले. गुणवत्ता चाचण्या घेण्यासाठी कार्यक्षेत्रावरच एक अद्ययावत प्र्रयोगशाळा उभारली होती.हे काम पूर्ण झाल्यामुळे कोणताही मोठा भूकंप सुरक्षितपणे सहन करण्यासाठी कोयना धरण सज्ज झाले आहे. विविध शाखांतील ४० अभियंत्यांनी यासाठीी अहोरात्र सेवा दिल्या. कोयना धरण आता पूर्णपणे भक्कम करण्यात आले आहे. भूकंपाचा मोठा धक्का बसला तर धरणाला नक्कीच काही होणार नाही. मात्र, धरणाच्या सभोवतालच्या भागाची काळजी घ्यावी लागणार आहे.अभ्यासानुसार मजबुतीकरणाचे संधानक हे १८ ते २० सेंटीग्रेड या तापमानाचे पसरणे आवश्यक होते. तसेच मजबुतीकरणाचे संधानक १.५ मिटर एवढ्या उंचीचा एक थर पूर्ण केल्यानंतर ७२ तासांनी (तीन दिवस) त्यावरील दुसºया थराचे संधानक टाकावयाचे होते.दोन्ही संधानकाच्या थर्मल स्ट्रेसेस कमी करण्यासाठी या संधानकामध्ये पाण्याच्या पाईपचे जाळे तयार करून त्यामधून २२ अंश सेल्सियस तापमानाचे पाणी अंदाजे ४० ते ४५ दिवस सतत फिरत ठेवणे आवश्यक होते. उहढफर संस्थेच्या अभ्यासानुसार, संधानक पसरल्यानंतर तापमानातील महत्तम वाढ २४ अंश सेल्सियस एवढी अनुमानित होती. प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर ती २००उ ते २४०उ या तापमानादरम्यान दृष्टोत्पत्तीस आली. संधानकाचे तापमान मोजण्यासाठी प्रत्येक लिफ्टमध्ये थर्मोकपल्स बसविण्यात आले होते.दुसºया वर्षामध्ये जमिनीवरील धरणाच्या मुख्य भिंतीचे मजबुतीकरण संपूर्ण काँक्रीटचा अभंग जोड देऊन करण्यात आले. संपूर्ण कामासाठी ३५००० मे. टन सिमेंट, १५०० मे. टन पोलाद, १५००० मे. टन वाळू, तर ४००००० मे. टन खडीचा वापर करताना कामावर एकूण १०४ कोटी रुपये इतका खर्च आला.भूकंपाला तोंड देण्यासाठी ...१ ५० वर्षांनतर कोयना धरण मजबूत केले गेले; पण भूकंपाचे काय? भूकंप थांबणार आहे का? मग भूकंपाला तोंड देण्यासाठी काय केले पाहिजे? यांचा सर्वंकष विचार पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. देशातील आणि परदेशातील तज्ज्ञांशी चर्चा केली आणि कºहाडजवळ भूकंप विज्ञानाबाबत प्रयोगशाळा उभी केली आहे.२ भूकंप ही एक अटळ नैसर्गिक समस्या आहे. सुमारे ६३७१ कि़मी. त्रिज्या असलेल्या पृथ्वीच्या सर्वांत वरच्या थराचे सुमारे २० तुकडे (प्लेटस्) असून, त्यातील ७ प्लेटस् या मोठ्या व मुख्य आहेत. या प्लेटस् अंतर्गत हालचालीमुळे सतत सरकत आहेत. प्लेटस् सरकत असताना खडकामध्ये दाब किंवा ताण निर्माण होतात. केव्हातरी या दाबलेल्या किंवा ताणलेल्या खडकामध्ये भ्रंश निर्माण होता. असे भ्रंश होताना खडकामध्ये लहरी निर्माण होऊन त्या भूपृष्ठावर येतात व भूकंप होतो. प्लेटस्च्या कडांवर होणाºया भूकंपाला प्लेट बाऊंडरी भूकंप व प्लेटवर होणाºया भूकंपाला इंट्राप्लेट भूकंप असे म्हणतात.३ कोयना, चांदोली परिसरात होणारा भूकंप हा इंट्राप्लेट या प्र्रकारात मोडतो. भारतीय उपखंड उत्तर दिशेला सरकत असताना कोयना परिसरात सुमारे ५ ते ८ कि़मी. खोल खडकात ताण निर्माण होऊन भ्रंश होतात व भूकंप होतो. कोयना, चांदोली परिसरातील भूकंपाचे वैशिष्ट्य हे की, हे भूकंप उथळ केंद्रबिंदू असलेले आहेत व सातत्याने होणारे आहेत. तसेच त्यांचे प्रभावक्षेत्र हे कोयना-चांदोली पुरते मर्यादित आहे. हे लक्षात घेऊन हैदराबाद येथील संस्थेने कोयना, चांदोली भूकंपाचा अभ्यास करण्याचे योजिले व त्यासाठी (कोयना डीप सायंटिफिक प्रिलिंग प्रोग्राम) म्हणजे कोयना चांदोली परिसरात खोल (१.५ कि़मी. ते ७ कि़मी.) विघन विवरे घेण्याचे ठरविले व हे काम सध्या सुरू आहे.४ रासाटी या गावाजवळ १.५ कि़मी. चे विवर घेतले असून, उरनाळे व उदगीर येथे हे काम चालू आहे. आणखीन काही खोल विवरे घेण्यात येणार आहेत. या सर्व विवरांची खोली ८ ते ९ कि़मी. एवढी असणार आहे. याचा उद्देश असा की, या विवरांमध्ये काही उपकरणे बसवून खोल खडकात होणाºया हालचालींवर लक्ष ठेवणे, तसेच आता फक्त भूपृष्ठावरील भूकंप मापक यंत्राद्वारे मिळालेल्या माहितीवरून भूकंपाचा केंद्रबिंदू निश्चित केला जातो. त्याऐवजी भूपृष्ठाखाली वेगवेगळ्या खोलीतून मिळालेल्या माहितीद्वारे भूकंपाचा केंद्रबिंदू निश्चित करण्यात येईल. थोडक्यात आतापर्यंत द्विमितीय माहितीच्या आधारे भूकंपाचा अभ्यास होत होता तो आता त्रिमितीय माहितीच्या आधारे करणे शक्य होणार आहे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdam tourismधरण पर्यटन