शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात विद्यार्थ्याच्या दप्तरात ई सिगारेट, शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर पालकमंत्रीही अवाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 19:23 IST

कोल्हापूर : शहरातील खरी कॉर्नर परिसरातील एका मोठ्या शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याच्या दप्तरात ई सिगारेट सापडल्याची वस्तुस्थिती जिल्हा ...

कोल्हापूर : शहरातील खरी कॉर्नर परिसरातील एका मोठ्या शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याच्या दप्तरात ई सिगारेट सापडल्याची वस्तुस्थिती जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी सांगितले आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे देखील अवाक झाले. जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीदरम्यान यामुळे वातावरण बदलले आणि याबाबत चिंता व्यक्त करताना उपाययोजनांबाबतही चर्चा करण्यात आली.माध्यमिक शिक्षण विभागाचा आढावा सुरू असताना पालकमंत्र्यांनी माध्यमिक शाळांची अवस्था पाहिल्यानंतर काही गोष्टींबाबत त्यांना जाणीव करून देण्याची गरज आहे. तंबाखुमुक्त शाळा धोरणाची कडक अंमलबजावणी करण्याची सूचना पालकमंत्री करत असतानाच डॉ. आंबोकर यांनी हा प्रकार सांगितला. याच शाळेतील काही मुलांच्या खिशात हजार, दीड हजार रूपये सापडले. त्यांच्या पालकांना बोलावून विचारणा केली असता आम्ही पैसे दिले नव्हते. यांच्याकडे पैसे कुठून आले. आम्हालाही माहिती नसल्याचे सांगितले.

हे ऐकल्यानंतर मात्र पालकमंत्र्यांनी अशा परिस्थितीत आपल्या सर्वांचीच जबाबदारी वाढली असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, व्यसनविरोधी वातावरण तयार करण्यासाठी मेळावे घ्या. मुलांना, पालकांना बोलवा. या क्षेत्रातील समुपदेशकांना निमंत्रित करा. याच वयात मुलांना काही चांगल्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक सांगितल्या पाहिजेत. पालकही मुले शाळेला गेलीत म्हणून निवांत राहतात. त्यांनाही जबाबदारीची जाणीव करून द्या.

पानपट्टीवाल्यांना हात करून जातातआबिटकर म्हणाले, शाळांच्या १०० मीटरच्या आवारात तंबाखू विक्री असू नये असा शासनाचा नियम आहे. परंतु अनेक शिक्षकच पानपट्टीवाल्याला हात करत ‘कसं काय बरं हाय का’ असे विचारत जातात. हे बरोबर नाही. याबाबत ठोस काही तरी कृती कार्यक्रम करा अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळाStudentविद्यार्थीguardian ministerपालक मंत्री