डी.वाय. पाटील विद्यापीठाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:24 IST2021-01-23T04:24:04+5:302021-01-23T04:24:04+5:30
कसबा बावडा : डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ व ताराराणी विद्यापीठाचे कमला कॉलेज या शैक्षणिक संस्थांमध्ये नुकताच सामंजस्य करार झाला. ...

डी.वाय. पाटील विद्यापीठाचा
कसबा बावडा : डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ व ताराराणी विद्यापीठाचे कमला कॉलेज या शैक्षणिक संस्थांमध्ये नुकताच सामंजस्य करार झाला. दोन्ही संस्थामध्ये शैक्षणिक सुविधांच्या आदान-प्रदानासह संयुक्त उपक्रम राबविण्यावर एकमत झाले आहे. दोन्ही संस्थामध्ये पायाभूत सुविधांबरोबरच कौशल्य, तंत्रज्ञान व अनुभवाचे आदान-प्रदान होणार आहे. तसेच डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधा पुरवल्या जातील. यावेळी विशेष आरोग्य सेवांच्या बाबतीत सल्ला व मार्गदर्शन देण्यावर व शैक्षणिक सहकार्य व योगदान देण्याबाबत यावेळी दोन्ही विद्यापीठांमध्ये सहमती झाली.
या सामंजस्य करारावर डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या वतीने कुलगुरु प्रा. राकेशकुमार मुदगल व कुलसचिव डॉ. व्ही.व्ही. भोसले यांनी, तर ताराराणी विद्यापीठाच्या वतीने कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील व कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, प्र-कुलगुरु डॉ. शिंपा शर्मा, मेघराज काकडे, मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. आर.के. शर्मा, हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, वित्त अधिकारी स्वामी, परीक्षा नियंत्रक अरुण पवार आदी उपस्थित होते.
फोटो २२ डीवाय पाटील करार
ओळी : डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ व ताराराणी विद्यापीठाचे कमला कॉलेज या शैक्षणिक संस्थांमध्ये सामंज्यस्य करारावेळी डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतीकुमार पाटील, कुलगुरु, प्रा. राकेश कुमार मुदगल, प्र-कुलगुरु डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही.व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. आर.के. शर्मा, प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर आदी.