डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये कोविड लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:45 IST2021-03-04T04:45:16+5:302021-03-04T04:45:16+5:30
ऑनलाइन नोंदणी करणे शक्य नसल्यास डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटल येथेही नावनोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जाहीर ...

डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये कोविड लसीकरण सुरू
ऑनलाइन नोंदणी करणे शक्य नसल्यास डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटल येथेही नावनोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटल येथे प्रतिडोस २५० रुपये शुल्क आकारून ही लस दिली जात आहे. नोंदणी व लसीकरणासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणताही एक पुरावा देणे गरजेचे आहे, तसेच ४५ वर्षांवरील व्याधिग्रस्तांसाठी नोंदणीकृत डॉक्टरचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
सर्वसामान्यांसाठी सुरू असलेल्या कोविड लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी मोठा प्रतिसाद मिळाला. कोरोनापासून संरक्षण मिळवण्यासाठी ही लस अत्यंत प्रभावी असून, तिचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी केले आहे.