चिमुकल्या खेळाडूंची दसरा स्केटिंग रॅली
By Admin | Updated: October 7, 2014 23:37 IST2014-10-07T23:25:01+5:302014-10-07T23:37:29+5:30
कोल्हापूरच्या तिघी राज्य महिला संघात

चिमुकल्या खेळाडूंची दसरा स्केटिंग रॅली
हरिपूर : सांगली, मिरज आणि कुपवाड रोलर स्केटिंंग असोसिएशनतर्फे दसऱ्यानिमित्त आयोजित केलेली चिमुकल्यांची स्केटिंंग रॅली यशस्वी पार पडली. मारुती चौकातील छत्रपती शिवाजी पुतळ्यास पहाटे अभिवादन करून रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी गणेश कणसे, संतोष धनवडे, रमेश शिंदे, प्रदीप घडशी, परवीन शिंदे, रमेश पाटील, दीपाली काळेल, बी. एन. सव्वाशे, रेखा कणसे, आदी उपस्थित होते. वीस राज्य-राष्ट्रीय छोटे स्केटिंंगपटू या रॅलीत सहभागीत झाले होते. सांगली-कोल्हापूर असा अखंड प्रवास या स्केटिंंगपटूंनी न थकता केला. कोल्हापुरात गेल्यानंतर खेळाडूंनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.
रॅलीत सहभागी झालेले खेळाडू असे : वेदिका घडशी, पंकजसिंह देशमुख, श्रवण काळेल, सक्षम काळेल, दिया शिंदे, साई कणसे, अनुज कोकरे, साईश वडेर, ओम नंदगावकर, मैत्रेयी पाटील, अखिलेश शिंदे, अखिलेश ओतारी, श्रद्धा होनमारे, रितेश पाटील, नासिर नदाफ, साहील नदाफ, सुमेरा मुजावर, सूरज यिंदे, विकास चव्हाण, सागर माळी. सर्व यशस्वी खेळाडूंना राष्ट्रीय स्केटिंंग प्रशिक्षक सूरज शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
कोल्हापूरच्या तिघी राज्य महिला संघात
कोल्हापूर : १९ वर्षांखालील महिला महाराष्ट्र संघाची निवड चाचणी नुकतीच पुणे येथे घेण्यात आली. या संघात कोल्हापूरच्या शिवाली शिंदे, ऋतुजा देशमुख, आदिती गायकवाड या तीन महिला क्रिकेट खेळाडूंची निवड झाली.
या संघाचे सराव शिबिर पुणे येथे सुरू आहे. त्यातून हा संघ निवडण्यात आला. शिवाली शिंदे हिची यापूर्वी सलग चार वर्षे महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील महिला संघात निवड झाली होती. यावर्षी ती महाराष्ट्र संघाची कर्णधारही होती. सलग तीन वर्षे खुला गट महाराष्ट्र संघातूनही ती खेळत आहे.
या तिन्ही महिला खेळाडूंना कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर, सचिव रमेश कदम, माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)