शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कळे रस्त्यावर तोडली झाडे चौदाशे, साडेपाच हजारपैकी लावली फक्त पाचशे

By संदीप आडनाईक | Updated: June 2, 2025 17:31 IST

वनविभागाची बांधकाम विभागाला नोटीस : महामार्ग प्राधिकरणचा झाडे लावल्याचा दावा

संदीप आडनाईककोल्हापूर : कोल्हापूर ते गगनबावडा रस्ते रुंदीकरणदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गालगत रस्त्याच्या दुतर्फा तोडलेल्या १३९४ झाडांच्या बदल्यात ५५७६ झाडे लावणे अपेक्षित असताना अशास्त्रीय पद्धतीने अवघी ५०० विदेशी रोपे लावली आहेत.

याबाबत कोल्हापूर वनविभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प यांना नोटीस काढलेली आहे. दरम्यान यासंदर्भात निसर्गप्रेमींनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह पोलिस अधीक्षक कार्यालय आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे तक्रार केली असून या प्रकरणाची दाद मागितली आहे.कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील वृक्षतोड प्रकरणी जिल्ह्यातील सर्व निसर्गप्रेमी, वर्ल्ड फॉर नेचर संस्थेने १९ मे रोजी वनविभागाकडे तक्रार केली होती. यासंदर्भात संस्थेने २८ मे रोजी कोल्हापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांची भेट घेतली. यावेळी अरुण सावंत, दिग्विजय शिर्के, परितोष उरकुडे, विदुला स्वामी, अमोल बुड्ढे, सविता साळोखे, स्वाती कदम, मंगल काळे, संतोष औंधकर, अरुणकुमार पोतदार, अभिजीत वाघमोडे यांनी संबंधित ठेकेदाराने पन्हाळा तालुक्यातील मौजे इंजोळे आणि वाघवे गावात गुलमोहर, निलमोहर, पेल्टोफोरम, शंकासूर, विलायती चिंच, अशी ५०० रोपांची अशास्त्रीय पद्धतीने लागवड करून नियम आणि निकषांची पायमल्ली केल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आणून दिले. वनविभागाने या तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात रस्त्याच्या दुतर्फा १० ते १२ फूट उंचीची झाडे लावण्याचा आदेश नोटिसीत दिला आहे.निकष धाब्यावरठेकेदाराने आंबा, फणस, वड, पिंपळ, लिंब अशी १० ते १२ फूट लांबीचे रोपे लावणे अपेक्षित होते; पण निसर्गप्रेमींच्या रेट्यामुळे ठेकेदाराने घाईघाईत अडीच ते तीन फुटांची विदेशी रोपे इंजोळे गावातील गायरान गट क्रमांक २७ येथे लावून वनविभागाच्या नियमांची व निकषाची पायमल्ली केली आहे.

प्रकल्प यंत्रणेने वृक्षतोड परवाना दिल्यावर झाडे लावतात की नाही, याची खात्री करावी. झाडे न लावल्यास वृक्ष अधिकारी या नात्याने नियमानुसार कार्यवाही करून अहवाल वनविभागाकडे सादर करावा. -जी. गुरुप्रसाद, उपवनसंरक्षक, कोल्हापूर वनविभाग.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरणhighwayमहामार्ग