पन्हाळ्यावर महेश मांजरेकरांच्या चित्रपटाच्या शुटिंगवेळी एक जण तटबंदीवरून कोसळला, गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 22:52 IST2023-03-18T22:51:27+5:302023-03-18T22:52:48+5:30
पन्हाळा येथे सज्जा कोठी परिसरात मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना घोड्यांची देखभाल करणारा कर्मचारी तटबंदीवरून खाली पडल्याने जखमी झाला.

पन्हाळ्यावर महेश मांजरेकरांच्या चित्रपटाच्या शुटिंगवेळी एक जण तटबंदीवरून कोसळला, गंभीर जखमी
पन्हाळा :
पन्हाळा येथे सज्जा कोठी परिसरात मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना घोड्यांची देखभाल करणारा कर्मचारी तटबंदीवरून खाली पडल्याने जखमी झाला. नागेश खोबरे (रा. सोलापूर) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याला तातडीने कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
पन्हाळ्यावर गेल्या दहा दिवसांपासून महेश मांजरेकरनिर्मित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. शनिवारी दिवसभर सज्जा कोठी परिसरात चित्रीकरण सुरू होते. रात्री नऊ वाजता चित्रीकरण संपल्यानंतर घोड्यांची देखभाल करणारा नागेश खोबरे हा फोनवर बोलत असताना तोल जाऊन तटबंदीच्या खाली पडला. गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याची नोंद पन्हाळा पोलिस ठाण्यात झाली आहे.