शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
2
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
3
शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
4
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
5
Municipal Corporation Election 2026 LIVE Updates: २०११ पासून केला जातो मार्कर पेनचा वापर, शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही - निवडणूक आयोग
6
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
7
'ट्रम्प' धोरणांचा दुहेरी फटका! व्हिसा स्टॅम्पिंगमध्ये होणाऱ्या विलंबामुळे भारतीयांना नोकऱ्या जाण्याची भीती
8
स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
9
"हे बोगस मतदानासाठी तर नाही ना", व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका
10
रशियाच्या रडारवर दोन युरोपियन देश; पुतीन यांच्या डोळ्यात का खुपत आहेत ब्रिटन आणि जर्मनी?
11
धुळे महापालिका निवडणूक: प्रभाग १८ मध्ये राडा, EVM ची तोडफोड, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
12
I-PAC Raid Case: सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका; आय-पॅक प्रकरणात धाडली नोटीस!
13
ही कसली लोकशाही? निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा; उद्धव ठाकरे कडाडले
14
BSNL चा 'महाधमाका'! हाय-स्पीड WiFi प्लॅनवर २०% सवलत; ५००० GB डेटासोबत OTT देखील मोफत!
15
संसार मोडला अन् आयुष्यही संपवलं! पत्नी ४ मुलांसह गायब; संतापलेल्या पतीने सासरच्या दारातच स्वतःला पेटवले
16
'या' महाराणीनं भारत-चीन युद्धात देशासाठी दान केलेलं ६०० किलो सोनं, खासगी विमानं, विमानतळ; घराण्याकडे होती अफाट संपत्ती
17
नऊ वर्षे निवडणूक आयुक्त काय करत होते? पगार कशासाठी घेतात? उद्धव ठाकरे संतापले...
18
"मला राजकारण कळत नाही, वरचे निर्णय घेतात', मतदानाच्या दिवशीच सुभाष देशमुखांचा भाजपाला घरचा आहेर
19
IND vs PAK T20 World Cup: तिकीट बुकिंगसाठी चाहत्यांची ऑनलाईन गर्दी; वेबसाइटच झाली क्रॅश; अन्...
20
Palmistry: तळहातावर शंख, कमळ, मासा, धनुष्य यांसारखी चिन्ह देतात राजयोगाचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election Voting 2026: काँग्रेस-भाजपच्या उमेदवारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक

By उद्धव गोडसे | Updated: January 15, 2026 12:08 IST

उपनगरांमध्ये मतदानाला रांगा ; उच्चभ्रू वस्त्यांमध्ये थंडा प्रतिसाद

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी उत्साहात आणि चुरशीने मतदानाला सुरुवात झाली असून, सुमारे १५ टक्के मतदान झाले आहे. शहरातील उपनगरांमध्ये अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची गर्दी आहे. याउलट उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मतदानासाठी थंडा प्रतिसाद आहे. मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागत आहेत.दरम्यानच, प्रभाग क्रमांक पाचमध्ये न्यू पॅलेस येथील एका मतदान केंद्रावर काँग्रेसच्या उमेदवार सरोज सरनाईक आणि भाजपच्या उमेदवार पल्लवी देसाई यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. मतदारांवर ऑब्जेक्शन घेण्यावरून हा वाद झाला. पोलिसांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकला.

वाचा : इचलकरंजीत दोन तासात ७.८८ टक्के मतदान; डीकेटीई शाळेच्या केंद्रासमोर मोठी गर्दी, पोलिसांनी जमावाला पांगवलेशहरातील रामानंदनगर, जरगनगर, राजेंद्रनगर, सुभाषनगर, जवाहरनगर, विक्रमनगर, टेंबलाईवाडी यासह कसबा बावड्यात अनेक मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा आहेत. वृद्ध मतदारांना मतदान करण्यास विलंब होत असल्याने रांगा वाढत आहेत. उमेदवारांच्या बूथवरही उत्साही वातावरण आहे. मतदान केंद्रांवर अनावश्यक गर्दी वाढू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. पोलिस अधीक्षक योगेश कुमार, शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी शहरातील काही मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. उपनगरांच्या उलट उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मात्र सकाळच्या टप्प्यात मतदारांची फारशी गर्दी दिसत नाही. सम्राटनगर, सागरमाळ, प्रतिभानगर, रुईकर कॉलनी, रुक्मिणीनगर, ताराबाई पार्क, कारंडे मळा परिसरात मतदारांच्या मोठ्या रांगा दिसत नाहीत. त्यामुळे अगदी पाच-दहा मिनिटांत मतदान करून मतदार बाहेर पडत आहेत. या परिसरात काही ठिकाणी उमेदवारांचे बूथही रिकामे आहेत. मतदारांना मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election 2026: Heated Exchange Between Congress and BJP Candidates

Web Summary : Kolhapur municipal elections see enthusiastic voting in suburbs, slower pace in upscale areas. A verbal clash erupted between Congress and BJP candidates at a polling booth over voter objections, resolved by police intervention. Voting proceeds with police vigilance.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Votingमतदानcongressकाँग्रेसBJPभाजपा