शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
3
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
4
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
5
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
6
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
7
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
8
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
9
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
10
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
11
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
12
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
14
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
15
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
16
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
17
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
18
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
19
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
20
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात केंद्र, राज्य सरकारकडून मदतीचा हात, जिल्ह्यात दीड लाख निराधारांना योजनांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 11:54 IST

गेल्या वर्षभरात सर्वच क्षेत्रांना आर्थिक झळ सहन करावी लागलेली असताना जिल्ह्यातील निराधार नागरिकांना योजनांनी दिला मोठा आधार.

इंदुमती गणेश

कोल्हापूर : कोरोनामुळे नागरिकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत असताना निराधार, दिव्यांग, विधवा आणि वृद्धांसाठी शासनाच्या योजनांची संजीवनी मिळाली आहे. गेल्या वर्षभरात डिसेंबर २०२१ पर्यंत संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ, दिव्यांग, विधवा योजना या पाच योजनांच्या माध्यामातून जिल्ह्यातील एक लाख ४२ हजार ७१९ निराधारांना तब्बल ११९ कोटी ९७ लाख १४ हजार १०२ इतक्या रकमेचे वाटप करण्यात आले आहे.

राज्यातील निराधार नागरिकांसाठी राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी सर्वसाधारण-अनुसूचित जाती व श्रावणबाळ सर्वसाधारण-अनुसूचित जाती या दोन योजना राबवल्या जातात तर केंद्राच्या वतीने इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा व दिव्यांग या तीन योजना राबवल्या जातात. या दोन्ही योजना मिळून एका व्यक्तीला एक हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळते. गेल्या वर्षभरात सर्वच क्षेत्रांना आर्थिक झळ सहन करावी लागलेली असताना जिल्ह्यातील निराधार नागरिकांना या योजनांनी मोठा आधार दिला आहे.

कसा कराल अर्ज?

कोणत्या याेजनेखाली आपल्याला अर्थसाहाय्य हवे आहे त्याचा छापील अर्ज मिळतो. या अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला, अनुसूचित जातीचा असेल तर जातीचा दाखला, लाभार्थीचा व मुलांचा वयाचा दाखला ही कागदपत्रे तालुक्याच्या ठिकाणी सादर करावी लागतात. प्रत्येक तालुक्याला नऊ सदस्यांची एक समिती असते. ही समिती व तहसीलदारांकडून या अर्जाचा विचार करून तो मंजूर किंवा नामंजूर केला जातो. त्याआधी लाभार्थीच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली जाते.

..या आहेत अटी

वरीलपैकी कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर वार्षिक उत्पन्न २१ हजारांच्या आतच असले पाहिजे. अपंगत्व असेल तर किमान ४० टक्के अपंगत्व असावे, विधवा स्त्रीच्या मुलाचे वय २५च्या आत हवे, दिव्यांग व्यक्ती असेल तर उत्पन्नाची अट ५० हजारांपर्यंतची आहे. श्रावणबाळ योजनेसाठी किमान ६५ वय पूर्ण हवे.

किती रुपयांची मिळते मदत

राज्य शासनाची व केंद्र शासनाची अशा दोन योजना मिळून एका व्यक्तीला महिन्याला साधारण एक हजार रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य मिळते.

कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी

तालुका संजय गांधी योजना श्रावणबाळ योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ इंदिरा गांधी विधवा इंदिरा गांधी दिव्यांग योजना
कोल्हापूर उत्तर ३ हजार ३६० २१७३४१६३०
कोल्हापूर दक्षिण ७ हजार १३७ १२ हजार ७३२ २ हजार ५६४ ५७
कागल४ हजार ४ ८ हजार ८६० ३ हजार ४५० २७७२०
पन्हाळा २ हजार १२९ १ हजार ४५९ ६६९५१११
शाहूवाडी १ हजार ५५९ ८३६३१० ४५
हातकणंगले ४ हजार ७५९ ५ हजार ५८८ २ हजार २३ ४०३१५
इचलकरंजी ६ हजार २१३ १० हजार ८५६ ३ हजार ३६९ ५२३ 
शिरोळ५ हजार ७३१ ११ हजार ४८९ ३ हजार १२९ ३२७२१
राधानगरी२ हजार ३१६ ४ हजार २८ २ हजार ३७५ १५६१८
भुदरगड१ हजार ८३७ ४ हजार १५३ १ हजार १०३ 
गगनबावडा ३६७५९५२५९
गडहिंग्लज ४ हजार ९५८ ४ हजार १९४ ६५५७६ २४
आजरा २ हजार २०७ ८६५८२७६०११
चंदगड २ हजार ९९१ १ हजार ४४० ५२१४७
एकूण ४९ हजार ५६८ ६९ हजार २६८ २१ हजार ६७० २ हजार ६४ १४
टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या