During the Thackeray government, the fence is eating away at the farm: Criticism of Pramod Jathar | ठाकरे सरकारच्या काळात कुंपणच शेत खात आहे : प्रमोद जठार यांची टीका

ठाकरे सरकारच्या काळात कुंपणच शेत खात आहे : प्रमोद जठार यांची टीका

ठळक मुद्देठाकरे सरकारच्या काळात कुंपणच शेत खात आहे प्रमोद जठार यांची टीका

कणकवली : राज्यात ठाकरे सरकार सत्तेत आले आणि जनतेला वाटले की, बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षीत असलेले हिंदुत्ववादी , महिलांचा सन्मान करणारे , रयतेचे सरकार आले . परंतु आता विपरीत घडत असून ठाकरे सरकारच्या काळात कुंपणच शेत खाऊ लागले आहे. अशी टीका भाजप प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील लोकांना काही तरी चांगले घडेल असे वाटत होते. लोकांना वाटले रांज्याच्या पाटलाचे हात कलम करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव लावणारी ही शिवसेना आहे. मात्र, ही तर मुघलांपेक्षा वाईट औरंगीसेना झाली आहे .रयतेच्या काडीलाही हात लावू नका असे सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण शिवसेनेच्या बाबतीत हवेत विरुन गेली आहे.

ठाकरे सरकारातील मंत्र्यांचे कारनामे पाहिले तर मान शरमेने खाली जाते. मुख्यमंत्र्यांनी जनतेला न्याय देण्याच्या वचनानाम्यातील शिवशाहीतील वाघोबाचा पेशवाईतील राघोबा झाला आहे . असे म्हणावेसे वाटते. रामशास्त्री बाणा दाखवून इतिहास घडविण्याची संधी या गब्रु सरकारने गमावली आहे, असेही प्रमोद जठार यांनी या म्हटले आहे.
 

 

 

 

Web Title: During the Thackeray government, the fence is eating away at the farm: Criticism of Pramod Jathar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.