दुर्गाप्रसाद दासरी ‘पश्चिम महाराष्ट्र श्री’

By Admin | Updated: January 6, 2016 00:20 IST2016-01-06T00:03:52+5:302016-01-06T00:20:15+5:30

पंचक्रोशी गाव मर्यादित गटात सूरज ठमके याने ‘गडमुडशिंगी श्री’चा किताब पटकावला.

Durgprasad Dasari 'Western Maharashtra Shri' | दुर्गाप्रसाद दासरी ‘पश्चिम महाराष्ट्र श्री’

दुर्गाप्रसाद दासरी ‘पश्चिम महाराष्ट्र श्री’

गांंधीनगर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे झालेल्या ‘पश्चिम महाराष्ट्र श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत दुर्गाप्रसाद दासरी याने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला, तर मोस्ट इम्प्रुव्हड म्हणून मिरजेच्या रियाज पठाण व बेस्ट म्युझिक पोझर म्हणून इचलकरंजीच्या आकाश मकोटे यांना गौरविण्यात आले. पंचक्रोशी गाव मर्यादित गटात सूरज ठमके याने ‘गडमुडशिंगी श्री’चा किताब पटकावला. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाले, तर उपसरपंच तानाजी पाटील प्रमुख उपस्थित होते.
स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. पंच म्हणून बिभीषण पाटील, विवेक खवरे, मानसिंग भोसले, राहुल परीट, सुहास व्हटकर यांनी काम पाहिले. या कार्यक्रमास ग्रा. सदस्य जितेंद्र यशवंत, शिवाजी गिरुले, वैभव गवळी, संजय कवडे, कृष्णात दांगट, निवास माळी, दीपक रणदिवे, आदी उपस्थित होते. आयोजन राकेश कुरळे यांनी केले.


स्पर्धेचा गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे -
गडमुडशिंगी ‘श्री’ गट सुरेश ठमके, रवींद्र चौव्हाण, सुशांत माळी. पश्चिम महाराष्ट्र मर्यादित गटात (सातारा, सांगली, कोल्हापूर) विभागीय स्पर्धा ६० किलो वजन गट : विजय शिंदे, सागर संकपाळ, संदीप लाखे. ६५ किलो गट : महंमद आळूरकर, महंमद बेपारी, विजय कुंभार. ७० किलो : आकाश मकोटे, मयूर सूर्यवंशी, अय्याज मुल्लाणी. ७५ किलोवरील खुला गट : दुर्गाप्रसाद दासरी, अजिंक्य रेडेकर, विशाल कांबळे, आदी.

Web Title: Durgprasad Dasari 'Western Maharashtra Shri'