शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

Kolhapur: हाळवणकरांनी धरला हात, आवाडे पिता-पुत्र भाजपात; तीन दशकानंतर पारंपरिक विरोधक एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 12:13 IST

कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन दशकांपासून राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांचा हात हातात घेऊन माजी ...

कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन दशकांपासून राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांचा हात हातात घेऊन माजी आमदार, भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनाच आवाडे पिता-पुत्रांना भाजपमध्ये प्रवेश देण्याची वेळ बुधवारी आली. हयातभर विरोध केलेल्या आवाडे यांच्या भाजप प्रवेशासाठी हाळवणकर यांना घालाव्या लागलेल्या पायघड्यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलणार असली तरी पक्षाने आपल्याच निष्ठावंत पदाधिकाऱ्याचा घेतलेला बळी हाळवणकर समर्थक स्वीकारणार का, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे २०१९ पासून भाजप प्रवेशासाठी आतूर असलेल्या आवाडे यांना हाळवणकर यांच्या विराेधामुळेच प्रवेश करता आला नव्हता. आवाडे यांचा पक्षप्रवेश अगोदरच निश्चित झाला होता; परंतु हाळवणकर यांनी आवाडे पिता-पुत्रांना घेऊन व्यासपीठावर यावे, अशी घोषणा माइकवरून करण्यात आली. त्यावेळी काही क्षण सारेच थबकले. पक्षाचा आदेश मानून हाळवणकर हसतहसत उठले आणि प्रकाश आवाडे व राहुल यांना दोन्ही हातांना धरून घेऊन ते व्यासपीठावर गेले आणि आवाडे यांची भाजप प्रवेशाची प्रतीक्षा संपुष्टात आली.

इचलकंरजी विधानसभा मतदारसंघात आवाडे-हाळवणकर हे तीन निवडणुकांमध्ये आमनेसामने लढले. यात २००९ आणि २०१४ अशा सलग दोन निवडणुकांमध्ये सुरेश हाळवणकर यांनी प्रकाश आवाडे यांचा पराभव केला. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात सलग दोन वेळा कमळ फुलवल्याने भाजपमध्ये हाळवणकर यांचे राजकीय वजन वाढले. पुढे २०१९ च्या निवडणुकीत आवाडे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि हिंदुत्ववादी मतांचे पाठबळ मिळावे म्हणून अपक्ष लढले व त्यात विजयी झाले.निवडून आल्यावर त्यांनी लगेचच भाजपला पाठिंबा दिला, त्यामुळे ते पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा होती; परंतु त्यांना हाळवणकर यांच्या पक्षनिष्ठेने रोखून धरले होते. अखेर बेरजेच्या राजकारणाचा विजय झाला आणि आवाडे यांचे स्वागत करण्याची वेळ हाळवणकर यांच्यावरच आली. ज्यांचा प्रखर विरोध होता त्याच हाळवणकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ द्यायला लावून आगामी विधानसभा निवडणुकीतील अडसरही आवाडे यांनी दूर केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीPrakash Awadeप्रकाश आवाडेSuresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकरBJPभाजपा