शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

kolhapur Crime: बापानेच मुलाचा खून केला; अपघाताचा बनाव.., पण रक्ताच्या थेंबावरुन मोठा उलगडा झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 17:59 IST

जबाबात संशय बळावल्याने वडील दिलीप व मोठा भाऊ सचिन यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करताच दिली खून केल्याची कबूल

इचलकरंजी : तारदाळ (ता. हातकणंगले) येथील एका बापाने साथीदारांच्या मदतीने स्वत:च्या मुलाचा खून केला. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. राहुल दिलीप कोळी (वय ३१, रा. कोळी गल्ली, तारदाळ) असे खून झालेल्याचे नाव असून, याबाबत शहापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.वडील दिलीप कोळी याच्यासह विकास पवार (तारदाळ), सतीश कांबळे (तमदलगे) या दोघा साथीदारांना शहापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता या प्रकरणाचा उलगडा झाला.याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तारदाळ हद्दीतील रेल्वे रुळावर एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता अपघात की घातपात, अशी शंका व्यक्त झाल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळावरील परिस्थिती व काही अंतरापर्यंत असलेले रक्ताचे थेंब यावरून तपास करत पोलिसांनी नातेवाइकांकडे चौकशी सुरू केली. त्यामध्ये पोलिसांना जबाबात संशय बळावल्याने वडील दिलीप व मोठा भाऊ सचिन यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करताच वडील दिलीप यांनी कौटुंबिक वादातून अन्य साथीदाराच्या मदतीने राहुलचा खून केल्याचे कबूल केले. राहुल हा विवाहित असून, तो मद्यपी असल्याने वारंवारच्या वादातून पत्नी मुलासह माहेरी गेली आहे. त्यानंतरही त्याचा कुटुंबीयासोबत नेहमी वाद होत होता, असेही चौकशीत समजले आहे.घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी पाहणी करून तपासाबाबत सूचना केल्या. त्यानंतर काही तासांतच या घटनेचा उलगडा झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस