थकबाकीमुळे १८ कनेक्शन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 20:14 IST2017-09-07T20:13:34+5:302017-09-07T20:14:56+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहर पाणीपुरवठा विभागाने पाणीपट्टी थकबाकी वसुली मोहीम सुरूकेली असून,

थकबाकीमुळे १८ कनेक्शन बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शहर पाणीपुरवठा विभागाने पाणीपट्टी थकबाकी वसुली मोहीम सुरूकेली असून, गेल्या पंधरा दिवसांत ११६ थकबाकीदारांवर कारवाई करून १८ नळ कनेक्शन बंद केली, तर ७७ लाखांची थकबाकी वसुली केली.
थकबाकी वसूल करण्याच्या मोहिमेअंतर्गत २३ आॅगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ही कारवाई करण्यात आली. मीरा हौसिंग सोसायटी, मीनाज नजीर गवंडी, मारुती धनवडे, शिवाजी नाथा पोवार, शारदा दाभाडे, जिन्नाप्पा नेमाण्णा चौगले यांचा कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे. या कारवाईत १२ अनधिकृत, तर सहा थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले. कारवाईवेळी ७७ लाख, ०५ हजार ८०५ रुपयांची थकबाकी वसुली करण्यात आली. त्यामध्ये एकट्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची ६७ लाख ८१ हजार ५७९ रुपये थकबाकीचा समावेश आहे.
अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, अधीक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख मोहन जाधव, रणजित संकपाळ, संतोष कोळी, ताजुद्दीन सिदनाळे, श्रीधर मोरे, तुषार पोवार, किरण सणगर, साताप्पा जाधव, पंडित भादुलकर, रमेश मगदूम यांनी ही कारवाई केली.