शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 01:21 IST

चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, पन्हाळा तालुक्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देअनेक मार्गांवरील वाहतूक बंद : पडझडीने लाखो रुपयांचे नुकसान; सतर्कतेचे प्रशासनाचे आदेश

कोल्हापूर : जिल्ह्यात आज, शुक्रवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर ठेवण्यात आली आहे. दरम्यान, पंचगंगेचे पाणी राजाराम बंधाऱ्याजवळील इशारा पातळीकडे वेगाने वाढत असून, रात्री उशिरापर्यंत ७५ हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, पन्हाळा तालुक्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.शाहूवाडीत १४ घरांच्या भिंती कोसळल्यामलकापूर : परिसरातील कडवी नदीला आलेल्या पुरामुळे पेरीड, खोतवाडी बंधारा पाण्याखाली गेला आहे. तालुक्यातील १४ गावांतील घरांच्या भिंती पडल्या आहेत. ५४ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

कडवी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठची भात, ऊसशेती पाण्याखाली गेली आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील गोगवे, करंजोशी येथे वडाची झाडे पडली आहेत. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पावसामुळे बांबवडे आरोग्य केंद्राची संरक्षण भिंत पडली आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर गोगवे, करंजोशी येथे वडाची झाडे पडली आहेत. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. कडवी, शाळी, कासारी, वारणा नद्यांच्या पाण्याची पातळी वाढून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पेरिड, खोतवाडी बंधारे पाण्याखाली गेले आहेत.कृष्णा नदीत मृत माशांचा खचनृसिंहवाडी : पावसाने जोर धरल्याने कृष्णा नदीला पूर येऊन पाणी पात्राबाहेर पडली आहे. गुरुवारी पहाटेपासून नृसिंहवाडी-औरवाड पुलाच्या दोन्ही बाजूस मृत माशांचा खच पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. याच पुलावर नेहमी मासे पकडण्यासाठी येणारे मच्छिमार या मृत माशांच्या दुर्गंधीमुळे हैराण झाले आहेत. मासे कुजलेले असल्याने ते पकडण्याचा प्रयत्न कोणी केला नाही.

मृत माशांत कटार्ना, खिलाफ, वाम, मरळ आदी जातीचे दहा किलो वजनापर्यंतचे मासे तरंगताना दिसत आहेत. हे मासे कशाने मृत झाले हा संशोधनाचा विषय आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणावर नियंत्रण ठेवून असते, हेच या नदीकाठच्या जनतेला समजेनासे झाले आहे.पावसाळा सुरू झाल्यानंतर नदीपात्रात पावसाच्या पाण्यासोबत कारखान्याचे दूषित पाणी, औद्योगिक वसाहतीमधून येणारे केमिकलयुक्त पाणी या सर्व घटकाने नदीतील मासे मृत होण्याच्या घटना घडत असतात. मात्र, साध्या कारवाईचे फार्ससुद्धा आजपर्यंत कुठल्या कारखान्यावर झाल्याचे दिसून येत नाही. मोठ्या प्रमाणात मासे कोणत्या कारणाने मेले याचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.पश्चिम पन्हाळ्यात जोर कायम; नद्यांना पूरकळे : संततधार पावसामुळे पश्चिम पन्हाळ्यासह धामणी खोºयातील नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेले असून, विभागातील नद्यांवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. परखंंदळे-गोठे पुलावर पुराचे पाणी वाढत असल्याने रस्ता बंद केला आहे. त्यामुळे धामणी खोºयातील गोठे, तांदूळवाडी, आकुर्डे, आंबर्डे, आदी गावांचा दळणवळणाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.मुसळधार पावसामुळे कळे-सावर्डे, गोठे-परखंदळे, सुळे-आकुर्डे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पिकांचे नुकसान झाले आहे. तीन दिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. मात्र, भात रोप लावणी, भुईमूग, नाचणी या पिकांना पोषक असाच पाऊस सुरू आहे.संततधार पावसामुळे नद्यांना पूर; घरांची पडझडपन्हाळा : संततधार पावसामुळे कुंभी, धामणी, कासारी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बहुतेक बंधारे पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे घरांची पडझड झाली आहे. नद्यांना पूर आला असून, कासारी नदीवरील करंजफेण, कांटे, पेंडाखळे, बाजारभोगांव, वाळोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपण व यवलूज हे आठ, धामणी नदीवरील सुळे व आंबर्डे हे बंधारे पाण्याखाली गेले. माजगाव पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक कसबा ठाणेमार्गे सुरू आहे. कासारी धरणात १.७५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.तुळशीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूरriverनदी