शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

स्वकर्मानेच सतेज यांचा पराभव -काही झाले तरी मीच खासदार : धनंजय महाडिक यांचा पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 01:26 IST

मी सरळ आणि सोपा खासदार आहे. कोणालाही फसवलेले नाही. जे बोलतो तेच करतो; पण काहींच्या डोक्यात २४ तास राजकारण असते. पराभूत झालो की महाडिकांमुळे आणि विजयी झालो की माझ्या हिंमतीवर अशी ही प्रवृत्ती आहे. कर्तृत्व व स्वत:च्या कर्मामुळेच त्यांचा गेल्यावेळेला कोल्हापूर दक्षिण विधानसभा

कोल्हापूर : मी सरळ आणि सोपा खासदार आहे. कोणालाही फसवलेले नाही. जे बोलतो तेच करतो; पण काहींच्या डोक्यात २४ तास राजकारण असते. पराभूत झालो की महाडिकांमुळे आणि विजयी झालो की माझ्या हिंमतीवर अशी ही प्रवृत्ती आहे. कर्तृत्व व स्वत:च्या कर्मामुळेच त्यांचा गेल्यावेळेला कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात पराभव झाला, असा पलटवार खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे नांव न घेता केला. लोकसभा, विधानसभा एकत्रित निवडणुका होऊ देत अथवा स्वतंत्र; आपणच खासदार असू, असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ नेते शरद पवार हे पंतप्रधान व्हावेत, यासाठी डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून पाठबळ दिले. त्यामुळे त्यांचा मुलगा अपरिपक्व असला तरी सुसंस्कृत घराण्यातील असल्याने ते वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी निश्चित आघाडीसोबत राहतील, आमचीही तीच इच्छा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. भीमा कृषी प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना सतेज पाटील यांनी फसवाफसवी करणाऱ्या खासदारांना या निवडणूकीत मदत करणार नाही अशी उघड भूमिका घेतल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. त्यास प्रत्युत्तर देताना महाडिक म्हणाले, ‘गेल्या निवडणुकीत कॉँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य, महाडिक गट, युवा शक्ती, भागीरथी संस्थेसह इतरांनी मदत केल्यानेच मोदी लाटेत आपण निवडून आलो. त्यानंतर विधानसभेसह सर्वच निवडणुकीत हे पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याने आपण पक्षाध्यक्ष पवार यांच्या सहमतीने तटस्थ राहिलो.

त्यामुळे ‘दक्षिण’मध्ये मी सतेज पाटील यांना मदत करू शकलो नाही, ही वस्तुस्थिती असली तरी त्यांच्या विरोधात प्रचार केला, हे म्हणणे चुकीचे आहे. राज्य आणि देशपातळीवर भाजपविरोधात सर्वपक्षीय मोट बांधण्याचे काम शरद पवार करत असताना अशा प्रकारे वक्तव्य करणे योग्य नाही. शरद पवार यांना एक-एक खासदार महत्त्वाचा आहे. पवार पंतप्रधान व्हावेत, यासाठीच ज्येष्ठ नेते

डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्टÑवादीत प्रवेश केला. वडील आणि मुलगा वेगवेगळी भूमिका घेणार नाहीत.’सर्व पक्षांनी मदत केली म्हणून प्रत्येक वेळी वेगवेगळी भूमिका घेऊन ज्या पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली त्याच्याशी प्रतारणा करणे हे योग्य आहे का, अशी विचारणा पत्रकारांनी केल्यावर ‘मग काय करायचे..? असे उत्तर महाडिक यांनी दिले.पक्षांतर्गत मतभेद संपुष्टातपक्षांतर्गत काही मतभेद होते. मुंबईतील बैठकीत नेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्याचे स्पष्टीकरणही शरद पवार यांच्यासमोर दिले. येथून मागे झालेल्या चुकांची दुरुस्ती करीत एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना दिल्याने आमच्यातील मतभेद संपुष्टात आले आहेत. आता आम्ही एकत्रित गावपातळीवर दौरे सुरू करणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले. 

महाडिक मदतीसाठी दारात गेले नाहीतबावड्यात फिरू देणार नाही, असे आव्हान महादेवराव महाडिक यांना दिल्याने ते सतेज पाटील यांच्या दारात गेले. कोल्हापूर म्हणजे बिहार आहे काय? हे विचारण्यासाठीच ते तिथे गेले. ते तिथे कोणाच्याही मदतीसाठी गेले नसल्याचे धनंजय महाडिक यांनी सागिंतले. 

भावाच्या विरोधात कशी मदत करायची?गत निवडणुकीत अमल यांना उभे करण्याचा निर्णय महादेवराव महाडिक यांनी घेतला. अशा वेळी भावाच्या विरोधात कशी मदत करायची? मदत करू शकलो नाही; पण विरोधात प्रचार केला नसल्याचे महाडिक यांनी सांगितले.आदेश आला तर सतेज यांना भेटूलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांची भेट घेणार का? असे विचारले असता, पवारसाहेब आदेश देतील त्याप्रमाणे माझी भूमिका राहील. २० लाख लोकसंख्येचा मतदारसंघ असल्याने प्रत्येक घटकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे महाडिक यांनी सांगितले. 

मंडलिकांचे वक्तव्य अपरिपक्वतेचेगेल्या वर्षी भीमा कृषी प्रदर्शनात नऊ कोटींचा रेडा होता, त्याबद्दल संजय मंडलिक यांनी टीका केली होती. याबाबत विचारले असता, रेड्याची किंमत आम्ही नाही, त्यातील तज्ज्ञ ठरवितात. मंडलिक यांनी टीका केलेले व्यासपीठ राजकीय नव्हते. त्यांचे वक्तव्य हे अपरिपक्वतेचे असून, त्यांनी एकदा प्रदर्शन भरवून बघावे, असे आव्हान महाडिक यांनंी दिले.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक