शहरं
Join us  
Trending Stories
1
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
2
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
3
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
4
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
5
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
6
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
7
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
8
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
9
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
10
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
11
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
12
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
13
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
14
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
15
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?
16
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
17
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
18
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
19
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान

दूधगंगा, वारणेतून विसर्ग वाढला, पंचगंगेचे पाणी फक्त दीड फुटांने कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 17:49 IST

Kolhapur Flood : पावसाचा जोर ओसरला असलातरी अधून मधून येणाऱ्या जोरदार सरीमुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढच होत चालली आहे.सर्वच धरणातून कमी अधिक प्रमाणात होणाऱ्या विसर्गामुळे नद्या अजूनही इशारा पातळीवरुनच वाहत असल्याने महापुर ओसरण्यास वेळ लागत आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीवर २४ तासात अवघ्या दीड फुटाची घट झाली आहे. वारणा, दूधगंगा, चिकोत्रा धरणातून गुरुवारी विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देदूधगंगा, वारणेतून विसर्ग वाढला, पंचगंगेचे पाणी फक्त दीड फुटांने कमी महापूर ओसरण्याचा वेग मंदावला

कोल्हापूर: पावसाचा जोर ओसरला असलातरी अधून मधून येणाऱ्या जोरदार सरीमुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढच होत चालली आहे.सर्वच धरणातून कमी अधिक प्रमाणात होणाऱ्या विसर्गामुळे नद्या अजूनही इशारा पातळीवरुनच वाहत असल्याने महापुर ओसरण्यास वेळ लागत आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीवर २४ तासात अवघ्या दीड फुटाची घट झाली आहे. वारणा, दूधगंगा, चिकोत्रा धरणातून गुरुवारी विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.वारणा धरण ९१ टक्के भरल्याने ७ हजार ९८० वर असलेला विसर्ग १४ हजार ९८० क्यूसेक्सने वाढवण्यात आला आहे. दूधगंगा धरणाचा साठाही ८४ टक्केवर गेल्याने तेथून ३६०० क्यूसेक्स विसर्ग वाढवण्यात आला आहे. चिकोत्रा धरणही ९४ टक्के भरल्याने ५६० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग गुरुवारी संध्याकाळी सुरु करण्यात आला.

धरणातून वाढवलेल्या विसर्गाने वारणा व दूधगंगा, वेदगंगेत जास्तीचे पाणी येऊन महापूर ओसरण्यास वेळ लागत आहे. राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून विद्यूत विमोचकातून विसर्ग कायम आहे. शंभर टक्के भरलेल्या कडवी धरणातून विसर्ग वाढल्याने पंचगंगेच्या पाण्याला उतार कमी झाला असून अजूनही पाणीपातळी ३९ फूट या इशारा पातळीच्याही वर आहे.आठवडाभर पावसाचा लहरीपणाजिल्ह्यात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. अधून मधून एखाद दुसरी सर येत होती, त्यात फारसा जोर नव्हता. पुणे वेध शाळेने आज शुक्रवारी आणि उद्या शनिवारी रेड अलर्ट जारी केला असलातरी बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा झारखंड, राजस्थानकडे सरकल्याने दक्षिण भारतात मोठ्या पावसाचा अंदाज सध्या तरी नाही. ६ व ७ ऑगस्टला पाऊस परतेल, पुन्हा आठवडाभर ओढ घेईल असा सुधारीत अंदाज आहे.नदीकाठाला दुर्गंधीपावसाची उघडझाप सुरु असल्याने महापूर ओसरण्यास वेळ लागत आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या अजूनही इशारा पातळीच्यावरच वाहत आहेत. दिवसाला एक फुटभरच पाणी कमी होत आहे. त्यात धरणातील विसर्गामुळे बऱ्यापैकी पाणी स्थिर राहिल्याचे दिसत आहे.पिके कुजत असल्याने नदीकाठाला आता दुर्गंधी सुटली आहे.कोल्हापूर ते रत्नागिरी मार्ग बंदचगुरुवारी संध्याकाळपर्यंत अजूनही ३७ बंधारे पाण्याखाली असून यावरुन होणारी वाहतूक अन्य मार्गे सुरु आहे. कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग अजूनही बंदच आहे.धरणातील पाणीसाठा (टक्केवारीमध्ये)राधानगरी ९९, तुळशी ९२, वारणा ९३ , दूधगंगा ८४, कासारी ८१, आंबेओहोळ ८८ , कुंभी ८४, पाटगाव ९१, चिकोत्रा ९४, जंगमहट्टी ९८, कडवी, चित्री, घटप्रभा, जांबरे, कोदे १०० टक्केपाण्याखालील बंधारे

  • पंचगंगा: शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
  • भोगावती: हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे,
  • तुळशी: बीड, आरे, बाचणी
  • वारणा: चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगाव, मांगले सावर्डे, तांदूळवाडी, चावरे, खोची, दानोळी
  • कुंभी: कळे, वेतवडे
  • कासारी: यवलूज, पुनाळ, तिरपण, ठाणे आळवे
  • कडवी: सरुड पाटणे
  • वेदगंगा: कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली
  • दूधगंगा: दत्तवाड, बाचणी, सुळकूड, सिध्दनेर्ली
टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरRainपाऊसkolhapurकोल्हापूर