दारुच्या नशेत स्वत:च्या आईचा कामगाराने केला निघृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 17:20 IST2017-08-28T17:15:37+5:302017-08-28T17:20:20+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरातील माकडवाला वसाहतीत दारुच्या नशेत एका सेंट्रिंग कामगाराने स्वत:च्याच आईचा निघृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला. यल्लव्वा रामा कुचकोरवी (वय ६५) असे या महिलेचे नाव असून याप्रकरणी त्यांचा मुलगा सुनील (वय ३५) याला शाहुपुरी पोलिसांनी अटक केली आहे.

दारुच्या नशेत स्वत:च्या आईचा कामगाराने केला निघृण खून
कोल्हापूर : कोल्हापूरातील माकडवाला वसाहतीत दारुच्या नशेत एका सेंट्रिंग कामगाराने स्वत:च्याच आईचा निघृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला. यल्लव्वा रामा कुचकोरवी (वय ६५) असे या महिलेचे नाव असून याप्रकरणी त्यांचा मुलगा सुनील (वय ३५) याला शाहुपुरी पोलिसांनी अटक केली आहे.
यल्लव्वा या केसावर फुगे विकण्याचा व्यवसाय करत असेत. त्यांचा मुलगा सुनील हा सेंट्रींगचे काम करीत होता. त्याला दारुचे व्यसन होते. त्याच्या या व्यसनाला कंटाळून त्याची पत्नी आपल्या तीन मुली आणि एका मुलासह माहेरी मुंबईत रहात आहे.
सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सुनील दारु पिउन नशेत घरी आला. त्यातच त्याने आपल्या आईवर आपल्याजवळील चाकूने सपासप वार केले. त्यातच त्याच्या आईचा मृत्यू झाला. आईचा खून केल्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे करुन ते एका परातीत भरुन ठेवले होते.
माकडवाला वसाहतीमधील त्याच्या घराशेजारी राहणाºयांना कुचकोरवी यांच्या घरातून रक्त बाहेर येत असल्याचे पाहून संशय आला. त्यांनी घरात पाहिले असता हा अतिशय घृणास्पद प्रकार उघडकीस आला. शेजाºयांनी सुनील याला पकडून शाहुपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले. दारुच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी उघड होत आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.