शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: दारूड्या नवऱ्याचा चाकूने वार करून खून, पत्नीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 16:17 IST

गडहिंग्लज : दारू पिऊन सतत भांडणाऱ्या नवऱ्याच्या गळ्यावर पत्नीने रागाच्या भरात चाकूने वार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. रमेश रावसाहेब ...

गडहिंग्लज : दारू पिऊन सतत भांडणाऱ्या नवऱ्याच्या गळ्यावर पत्नीने रागाच्या भरात चाकूने वार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. रमेश रावसाहेब मोरे (वय ४०, रा. लिंगनूर कानूल, ता. गडहिंग्लज), असे मृताचे नाव आहे. प्रणिता रमेश मोरे (३५) हिला गडहिंग्लज पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी उघडकीस आली.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, लिंगनूर येथील रमेश मोरे हा गवंडीकाम करीत होता. दारूच्या व्यसनामुळे तो पत्नीकडे सतत पैसे मागत असे. अलीकडे काही कामधंदा करत नव्हता, घरी पैसेही देत नव्हता. त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होत असत. रमेशचा लहान भाऊ उमेश हा कामानिमित्त कागलला राहतो. आई त्याच्याकडे गेली होती. अलीकडेच लग्न झालेली मुलगी सासरी असून, मुलगा केदार हा यात्रेनिमित्त करंबळीला गेला होता. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास रमेश हा दारू पिऊन घरी आला व जेवून झोपला. दरम्यान, भांडी घासत असताना शिवीगाळ करून त्याने प्रणितासोबत भांडण काढले. प्लास्टिकच्या पाइपने मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे प्रणिताने रागाच्या भरात घरातील सुरीने त्याच्या गळ्यावर वार केल्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी सहकाऱ्यांसह लिंगनूरला धाव घेतली. स्वयंपाकगृहात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रमेशला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे नेले; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. घटनास्थळी डीवायएसपी रामदास इंगवले यांनीही भेट दिली. नातेवाइकांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

कारणांचा शोध सुरूरमेश हा प्लास्टिकच्या पाइपने मारहाण करीत असताना झटापटीत आपल्या हातातील सुरी त्याच्या गळ्याला लागली. जिवे मारण्याच्या उद्देशाने वार केलेला नाही, असे सांगितल्यामुळे पोलिसांनी प्रणिताला ताब्यात घेतले आहे. वेगळे काही कारण आहे का, याचीही चौकशी सुरू असून शवविच्छेदन अहवाल आणि मोबाइलमधील तांत्रिक माहितीवरून तपासाला दिशा मिळेल, असे पोलिस निरीक्षक सिंदकर यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस