विंधन विहीर अन्य ठिकाणी मारणाऱ्याकडून केली वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST2021-06-01T04:18:18+5:302021-06-01T04:18:18+5:30

कातळी (ता. गगनबावडा) येथे अनुसूचित जातीसाठी विंधन विहीर मंजूर झाली होती. ही विंधन विहीर सकाळी सहा वाजता गावात आल्यावर ...

The drilling well was recovered from the killer at another location | विंधन विहीर अन्य ठिकाणी मारणाऱ्याकडून केली वसुली

विंधन विहीर अन्य ठिकाणी मारणाऱ्याकडून केली वसुली

कातळी (ता. गगनबावडा) येथे अनुसूचित जातीसाठी विंधन विहीर मंजूर झाली होती. ही विंधन विहीर सकाळी सहा वाजता गावात आल्यावर एका ग्रा.पं.सदस्य यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता धनगर समाजाची तीन घरे असणाऱ्या बिरू पावणा यांच्या घराजवळ विंधन विहीर (बोअर) मारण्यात आली. याबाबतची माहिती सरपंच व ग्रामसेवक ए. के. तटकरे यांना समजताच ज्या समाजासाठी हि विंधन विहीर (बोअर ) मंजूर करण्यात आली आहे त्याच समाजासाठी ही विंधन विहीर (बोअर ) मारणे गरजेचे असलेचे सांगितले. यानंतर सरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांनी मक्तेदार व ग्रा.पं.सदस्य यांना धारेवर धरले. लखमापूर येथील अनुसूचित जातीसाठी मंजूर होऊन आलेली विंधन विहीर (बोअर) पूर्व कल्पना न देता का मारली? याबाबतचा खुलासा मागितला. याबाबतचा त्यांच्याकडून खुलासा घेऊन ग्रामसेवक यांनी त्यांना तत्काळ अनुसूचित जातीमध्ये विंधन विहीर (बोअर) मारण्यास सांगून ती विंधन विहीर मारूनही घेतली. यामुळे ग्रामसेवक ए. के. तटकरे, सरपंच उज्ज्वला पाटील, सदस्य उत्तम पाटील, कमल कांबळे, सुनीता लांबोर, नसिना, उषा पाटील, दिलावर मुलाणी, चंद्रकांत कांबळे,अशोक कांबळे,श्रीकांत कांबळे यांनी घेतलेल्या भूमिकेचे कातळी ग्रामस्थांतून कौतुक होत आहे.

Web Title: The drilling well was recovered from the killer at another location