शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
5
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
6
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
7
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
8
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
9
Viral News: एका उंदरामुळं इंडिगोच्या विमानाला साडेतीन तास उशीर, नेमकं काय घडलं?
10
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
11
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
12
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
13
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
15
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
16
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
17
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
18
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
19
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
20
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे

कोल्हापूर जिल्हा बँकेत ड्रेसकोड, कर्मचाऱ्यांचा ‘लूक’ बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 14:33 IST

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना ड्रेसकोडची सक्ती केली आहे; त्यामुळे एरव्ही वेगवेगळ्या कपड्यात दिसणाऱ्या कर्मचाऱ्यांचा लूक बदलला आहे. बोनस ८.५ टक्के देण्याचा निर्णय झाला होता, त्याऐवजी ९ टक्के दिला आणि त्यातून कर्मचाऱ्यानी दोन गणवेश घेण्याचा निर्णय झाला होता.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा बँकेत ड्रेसकोड, कर्मचाऱ्यांचा ‘लूक’ बदलला गणवेश न घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना ड्रेसकोडची सक्ती केली आहे; त्यामुळे एरव्ही वेगवेगळ्या कपड्यात दिसणाऱ्या कर्मचाऱ्यांचा लूक बदलला आहे. बोनस ८.५ टक्के देण्याचा निर्णय झाला होता, त्याऐवजी ९ टक्के दिला आणि त्यातून कर्मचाऱ्यानी दोन गणवेश घेण्याचा निर्णय झाला होता. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंत गणवेश सक्तीचे केले असून, बुधवार सवलतीचा दिवस सोडून, इतर दिवशी गणवेश न घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.राष्ट्रीयकृत सह सर्वच सहकारी बॅँकांच्या कर्मचाऱ्यांचा ड्रेसकोड असतो. कामकाजातील शिस्त म्हणून याकडे पाहिले जात असल्याने जिल्हा बॅँकेनेही कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड करावा, अशी चर्चा बॅँकेच्या २०१७ - १८ च्या सर्वसाधारण सभेत झाली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड सक्तीचा केला. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू केली आहे.

सवलतीचा दिवस सोडून अन्य दिवशी गणवेश परिधान न केल्यास प्रत्येक दिवसाला १00 रुपये व त्यावर १८ टक्के प्रमाणे जीएसटी अशी दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. गणवेश न घालणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अहवाल शाखाधिकाऱ्यांनी व्यवस्थापक व प्रशासन विभागास लेखी कळवायचे आहे. त्याची नोंद गोपनीय अहवालात होणार आहे.

तीन वेळा दंड भरूनही चौथ्यांदा गणवेश घातला नाही, तर संबंधित कर्मचाऱ्यांस कामावर हजर करून न घेता, सदर दिवसाची गैरहजेरी नोंद करून बिनपगारी करण्याच्या सूचना प्रशासनाने शाखाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अधिकारी, लिपिकांनी इनशर्ट व पायात बूट घालण्याची सक्ती आहे, तर शिपायांनाही पायात बुटाची सक्ती करण्यात आल्याने बॅँकेच्या कर्मचाऱ्यांचा एकदम लूक बदलला आहे.

पुढारीपण करणाऱ्यांची गोचीजिल्ह्यातील नेत्यांच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचाच भरणा जिल्हा बॅँकेत अधिक आहे; त्यामुळे अपवाद वगळता बॅँकेचा कर्मचारी हा आपआपल्या गावातील राजकीय नेताच आहे; त्यामुळे त्यांचा पेहरावही पुढाऱ्यासारखाच असतो. या पुढारीपण करणाऱ्यांची मात्र या निर्णयाने गोची झाल्याची चर्चा बॅँकेच्या वर्तुळात सुरू आहे.

फिक्कट जांभळा शर्ट, काळी पँट व गुलाबी साडीपुरुष कर्मचाऱ्यांना फिक्कट रंगाचा जांभळा शर्ट व काळ्या रंगाची पॅँट दिली आहे. शिपायांना राखाडी रंगाचा ड्रेस दिला आहे. महिला कर्मचाऱ्यांना गुलाबी रंगाची साडी, तर जे कर्मचारी ड्रेस वापरतात त्यांना त्याच रंगाचे ड्रेस दिले आहेत.

 

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर