शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

अनाथांना मायेची ऊब देणारे द्रौपदीतार्इंचे घर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2017 23:56 IST

मिरजेत उभारले सामाजिक कार्य : अठरा मुलांचा विवाह केला; नातेवाईक बनून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार

सचिन लाड --- सांगली --द्रौपदी जयवंत पिसाळ...मिरजेतील स्टेशन रस्त्यावर प्रताप कॉलनीत राहणारी एक साधी महिला...त्या दीड वर्षाच्या असताना आईचे छत्र हरपले. त्यांचा आजीने सांभाळ केला. रस्त्यावर भीक मागून जगल्या. गरीब आणि अनाथांचे दु:खणे काय असते, याचे चटके खाल्ल्याने त्यांचे अनाथ व वाट चुकलेल्या मुलांना आधार देण्याचे गेल्या २० वर्षांपासून कार्य सुरूआहे. १८ अनाथ मुलांचा त्यांनी स्वखर्चाने विवाहही केला. एवढे करून न थांबता बेवारस मृतदेहांच्या नातेवाईक बनून त्यांनी आतापर्यंत २९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. द्रौपदी पिसाळ मूळच्या सोलापूरच्या. लग्न झाल्यानंतर त्या मिरजेच्या झाल्या. मिरज स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर त्या कुटुंबासह राहतात. स्टेशनमधून बाहेर पडलेले सर्व प्रवासी त्यांच्या नजरेस पडतात. यामध्ये वाट चुकलेली, भेदरलेली मुलेही त्यांना दिसतात. मुलांना बोलावून त्या चौकशी करतात. पाच ते दहा वयोगटातील एक-दोन मुले सातत्याने त्यांना दिसतात. या मुलांकडे त्या चौकशी करतात. काहींना मराठी बोलता येत नाही. काही मुले चुकून रेल्वेतून आलेली असतात किंवा घरातील अडचणीमुळे बाहेर पडलेली असतात. काही मुलांना स्वत:चे नाव, गाव, पत्ता सांगता येत नाही, अशा मुलांना मायेचा आधार देण्याचे अनोखे कार्य त्या करतात. त्यांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय त्या करतात. एवढ्यावर न थांबता त्या या मुलांना शिक्षणही देतात. यासाठी त्या पोलिसांची मदत घेतात. पोलिसांनीही द्रौपदीतार्इंच्या कार्याला अनेकदा सलाम केला आहे. दहा वर्षांपूर्वी त्यांनी १८ अनाथ व वाट चुकलेल्या मुलांचे पालकत्व स्वीकारले. यामध्ये पाच मुली व १३ मुले होती. सात ते दहा वयोगटातील या मुलांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही. शेवटी या मुलांना त्यांनी शिक्षण दिले. त्यांना मोठे केले. एवढ्यावर न थांबता या सर्व मुला-मुलींची त्यांनी मिरजेतच लग्ने लाऊन दिली. सध्या ही १८ मुले सुखाने संसार करीत आहेत. द्रौपदीताईंच्या कार्याचे अनेकजण कौतुक करतात. रस्त्यावर एखादे मूल बेवारस दिसले तर, त्या लोकांना फोन करून माहिती देतात. बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार! द्रौपदी पिसाळ या मिरजेत कुठेही बेवारस मृतदेह सापडल्याचे समजताच घटनास्थळी जातात. पोलिसांना माहिती देतात. पोलिसांचा पंचनामा झाला की, मृतदेहाची विच्छेदन तपासणी केली जाते. त्यानंतर त्या मृतदेह ताब्यात घेतात. मृत व्यक्ती ज्या जातीचा आहे, त्या रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करतात. आतापर्यंत त्यांनी २९ मृतेदहांवर नातेवाईक बनून अंत्यसंस्कार केले आहेत. याची नोंदही त्यांनी ठेवली आहे. दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्यासाठी त्या कधीही मागे-पुढे पाहात नाहीत.