‘प्रत्यय’तर्फे ११ तारखेपासून नाट्य कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:13 IST2021-01-08T05:13:57+5:302021-01-08T05:13:57+5:30

कोल्हापूर : प्रत्यय हौशी नाट्य कला केंद्राच्या वतीने ११ ते १७ जानेवारीदरम्यान नाट्य कलाकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले जात आहे. ...

Drama Workshop by 'Pratyay' from 11th | ‘प्रत्यय’तर्फे ११ तारखेपासून नाट्य कार्यशाळा

‘प्रत्यय’तर्फे ११ तारखेपासून नाट्य कार्यशाळा

कोल्हापूर : प्रत्यय हौशी नाट्य कला केंद्राच्या वतीने ११ ते १७ जानेवारीदरम्यान नाट्य कलाकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले जात आहे. गायन समाज देवल क्लबमध्ये होणारी ही कार्यशाळा तरुणाईसाठी पर्वणी असणार आहे.

यात डॉ. शरद भुताडिया, सागर तळाशीकर, प्रकाश फडणीस, प्रभाकर वर्तक, विद्यासागर अध्यापक हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पुणे, मुंबईस्थित अभिनेते, लेखक व दिग्दर्शक कार्यशाळेस भेट देणार आहेत. यात ऑनलाईन कंटेंट निर्माते, निपुण धर्माधिकारी; निर्माते-दिग्दर्शक विनोद लव्हेकर, प्रदीप वैद्य यांचा समावेश आहे. अभिनेते आनंद काळे यांचे नियोजन आहे. कार्यशाळेत १८ वर्षांवरील तरुणांना सहभाग नोंदविता येईल. तरी जास्तीत जास्त कलाकारांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. माया पंडित यांनी केले आहे.

--

Web Title: Drama Workshop by 'Pratyay' from 11th