शहरं
Join us  
Trending Stories
1
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
2
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
3
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
4
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
5
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
6
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
7
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
8
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
9
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
10
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
11
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
12
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
13
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
14
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
15
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
16
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
17
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
18
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
19
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
20
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election: मनपाची मतदार यादी वादग्रस्त; चार प्रभागातील मतदार दुसऱ्याच प्रभागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:36 IST

गठ्ठा मतदारांची आदला, बदल; एका दिवसांत ३० हरकती : निवडणूक प्रशासनातर्फे पडताळणी सुरू

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी प्रसिध्द झालेल्या प्रारूप मतदार यादीतील मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याचे अनेक प्रकार समोर आल्यामुळे ही प्रारूप यादी वादग्रस्त बनली आहे. परिणामी यादीवर हरकतीची संख्या वाढत चालली आहे. रविवारी एका दिवसात तब्बल ३० आणि आतापर्यंत एकूण ३८ हरकती दाखल झाल्या आहेत. महापालिका निवडणूक यंत्रणाही यादीची पडताळणी करीत आहे. यादी तयार करण्यास कमी वेळ लागल्याने त्रुटी राहिल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाली आहे. यावर हरकती दाखल होत आहेत. गुरुवार अखेर हरकती दाखल करण्याची मुदत आहे. मात्र आतापर्यंत यादीतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. एक हजार मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याचे समोर आले आहे. प्रभाग एकमधील सुमारे ८०० ते एक हजार मतदारांची नावे प्रभाग क्रमांक दोनमध्ये समावेश केली आहेत.प्रभाग क्रमांक १८ मधील मतदारांची नावे प्रभाग क्रमांक १५ आणि १६ मध्ये बेकायदेशीरपणे घातल्याचा आरोप माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी केला आहे. या तक्रारीचे पत्र त्यांनी प्रशासनास दिले आहे. याप्रकरणी केंद्र स्तरीय अधिकारी किरण मुळे, श्रीकांत देवकर, अरुण गुजर, सहायक आयुक्त संजय सरनाईक यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

प्रभाग क्रमांक एकमध्ये...प्रभाग क्रमांक पाच मधील ११०० मतदारांची नावे प्रभाग एक मध्ये गेली होती. ती सर्व नावे परत प्रभाग क्रमांक पाचमध्ये समाविष्ट केली आहेत. सहाय्यक आयुक्त आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक एकमधील कसबा बावड्यात येऊन पाहणी करत याबाबत कार्यवाही केली.

गठ्ठा मतदारांची आदला, बदलकाहीही संबंध नसलेल्या प्रभागात गठ्ठा मतदारांची आदला, बदल झाल्याचे समोर आले आहे. प्रभागातील सीमेलगतच्या मतदारांची अदला, बदल अधिक झाली आहे. निवडणूक रिंगणात येऊ इच्छिणारे यावर आक्षेप घेत आहेत.

राजकीय हस्तक्षेप?मतदार यादीतील घोळ राजकीय हस्तक्षेपामुळे झाल्याचा आरोप होत आहे. काही इच्छुकांनी आपल्या हक्काचे मतदार आपण निवडणूक लढवणाऱ्या प्रभागात समाविष्ट करून घेतल्याचीही चर्चा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election Roll Controversy: Voters misplaced across wards.

Web Summary : Kolhapur's draft electoral roll is controversial due to voters being listed in wrong wards. Numerous objections are filed as errors surface. Around 1000 voters are misplaced. Political interference is suspected in this voter list mess.