सोनाली नवांगुळ यांना डॉ. प्रज्ञा जोशी स्मृती सन्मान प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 17:19 IST2020-08-01T17:17:38+5:302020-08-01T17:19:13+5:30

कोल्हापूर येथील लेखिका, अनुवादक सोनाली नवांगुळ यांना डॉ. प्रज्ञा जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पहिला पुरस्कार शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्यात आला. ३१ हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Dr. Sonali Nawangul Pragya Joshi Memorial Award | सोनाली नवांगुळ यांना डॉ. प्रज्ञा जोशी स्मृती सन्मान प्रदान

सोनाली नवांगुळ यांना डॉ. प्रज्ञा जोशी स्मृती सन्मान प्रदान

ठळक मुद्देसोनाली नवांगुळ यांना डॉ. प्रज्ञा जोशी स्मृती सन्मान प्रदानपुरस्काराची रक्कम आधी खात्यात

कोल्हापूर : येथील लेखिका, अनुवादक सोनाली नवांगुळ यांना डॉ. प्रज्ञा जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पहिला पुरस्कार शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्यात आला. ३१ हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

नांदेड येथील गॅलॅक्सी हॉस्पिटलचे संचालक, प्रख्यात पोटविकार तज्ज्ञ डॉ. नितीन जोशी यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. प्रज्ञा यांच्या स्मृतीनिमित्ताने या सन्मानाची सुरुवात केली आहे. हा पहिलाच पुरस्कार नवांगुळ यांना प्रदान करण्यात आला.

शुक्रवारी झालेल्या या ऑनलाईन कार्यक्रमात दीपप्रज्वलनानंतर डॉ. नितीन जोशी यांच्यासह निवड समितीचे सदस्य कवी प्रा. मनोज बोरगावकर आणि मुखपृष्ठकार नयन बाराहाते यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रतिकूल परिस्थितीला आव्हान देत आयुष्याशी दोन हात करणाऱ्या सोनाली यांचा संघर्ष प्रेरणादायी असल्याने त्यांना हा पुरस्कार देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नवांगुळ यांनीही यावेळी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

पुरस्काराची रक्कम आधी खात्यात

डॉ. प्रज्ञा नितीन जोशी स्मृती कृतज्ञता सन्मान देताना डॉ. जोशी यांनी कार्यक्रमाआधी पुरस्काराची ३१ हजार रुपयांची रक्कम नवांगुळ यांच्या खात्यात ऑनलाईन जमा केली आणि त्यानंतरच कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 

Web Title: Dr. Sonali Nawangul Pragya Joshi Memorial Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.