शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Women's Day Special: कोल्हापूरची डॉ. सानिका देते भटक्या, अपघातग्रस्त प्राण्यांना नवजीवन, गीरच्या जंगल परिसरात करते काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 15:43 IST

सानिकाला सगळेजण यावरून चिडवायचे, पण तिने याकडे दुर्लक्ष करत आपली सेवा सुरूच ठेवली

आदित्य वेल्हाळकोल्हापूर : स्वत:साठी सगळेच जगतात; पण दुसऱ्यांसाठी व त्यांच्या उद्दारासाठी जे वेगळे मार्ग स्वीकारता त्यांच्या कार्याला समाज नक्कीच लक्षात ठेवतो. त्यामुळे हे कार्य आदर्शवत व प्रेरणादायी ठरते. भूतदया परमो धर्म: हे आयुष्याचे ध्येय मानणारी डॉ. सानिका सावंत पशुवैद्यकीय शिक्षण घेत असून, ही कोल्हापूरची मुलगी गुजरातच्या एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भटक्या अपघातग्रस्त व रोगट प्राण्यांवर उपचार करून त्यांना नवजीवन देण्याचे काम करत आहे.आजोबा सुरेश शिपूरकर यांच्या संस्कारात वाढलेली सानिका. घरातील वातावरण सामाजिक चळवळीचे. मात्र, सानिकाला मांजराची, कुत्र्यांची प्रचंड आवड. आजोबांबरोबर एखाद्या आंदोलनाला गेली तर तेथील भटक्या प्राण्यांना शोधून त्यांना योग्य जागी ठेवण्याचे काम तिला आवडायचे. हळव्या मनाच्या सानिकाला सगळेजण यावरून चिडवायचे, पण तिने याकडे दुर्लक्ष करत आपली सेवा सुरूच ठेवली. सॅप संस्थेचे डॉ. संतोष वाळवेकर यांची प्रेरणा घेऊन सानिका कोल्हापूर शहरातील भटक्या प्राण्यांवर उपचार करत असे. हे काम करतानाच तिने पशुवैद्यकीय डॉक्टर बनण्याचे स्वप्न बाळगले व क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स येथे प्रवेश घेतला. येथे शिक्षण घेत असतानाच ती जखमी मांजरानं घेऊन वसतिगृहात राहायची. मात्र, वसतिगृह प्रशासनाने तिला मांजरसोबत ठेवण्यास नकार दिल्याने तिने वसतिगृह सोडून ती दुसरीकडे राहण्यास गेली.

गीरच्या जंगल परिसरात सानिकाचे कार्यगुजरातच्या अमरेली जिल्ह्यात पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून सानिका काम करत आहे. गिर जंगलात सिंहाचा वावर मोठा आहे. सिंहामुळे जखमी होणारी जनावरे, प्राणी, म्हैशी यांच्यावर गावात जाऊन उपचार करण्याचे काम सानिका करते. रात्री, अपरात्री तिला जनावरांवर उपचारासाठी जावे लागते. मात्र. महिला म्हणून ती कधीही याचा बाऊ करत नाही. जनावरांच्या अंगावरील जखमा, किडे याचा तिरस्कार न करता ती सेवा म्हणून आपली भूमिका निभावत आहे. एक महिला ही काय काम करू शकेल यावर तेथील नागरिकांचा विश्वास नव्हता. मात्र, तिच्या आदर्शवत कामामुळे आता स्वत:हून लोक तिला बोलवतात.

पशुवैद्यकीय क्षेत्रात महिलांची संख्या कमी आहे. मात्र, प्राण्यांवर माझे प्रेम आहे. आपल्या स्पर्शातून, नजरेतून, बोलण्यातून, संवादातून ते प्राणी बरे होतात. त्यामुळे मला या क्षेत्रात काम करायला आवडते. मला कोल्हापुरात अशा जखमी, भटक्या जनावरांचे संगोपन करण्यासाठी मोठे केंद्र उभारायचे आहे. - डॉ.सानिका सावंत 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomen's Day Specialजागतिक महिला दिनAnimalप्राणीdoctorडॉक्टरGujaratगुजरात