घोडावत विद्यापीठाच्या डॉ. उत्तम जाधव यांचे सेट परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:23 IST2021-05-01T04:23:31+5:302021-05-01T04:23:31+5:30
डॉ. जाधव यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण हे पंढरपूरमध्ये झाले. पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागातून प्रथम क्रमांकाने पूर्ण केले. पुढे ...

घोडावत विद्यापीठाच्या डॉ. उत्तम जाधव यांचे सेट परीक्षेत यश
डॉ. जाधव यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण हे पंढरपूरमध्ये झाले. पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागातून प्रथम क्रमांकाने पूर्ण केले. पुढे पीएच.डी. पदवी घेतली. डॉ. जाधव हे घोडावत शिक्षण संकुलामध्ये सन २०१३ पासून कार्यरत आहे. सन २०१७ मध्ये घोडावत इन्स्टिट्यूटचे विद्यापीठात रूपांतर करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व त्याची अंमलबजावणी या विषयावर व्याख्याने दिली आहेत. सेट परीक्षेतील त्यांच्या या यशाबद्दल घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, शैक्षणिक सल्लागार डॉ. बी. एम. हिर्डेकर, प्रभारी कुलगुरू डॉ. एम. टी. तेलसंग, कुलसचिव डॉ. एन. के. पाटील, संचालक डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
फोटो (३००४२०२१-कोल-उत्तम जाधव (सेट एक्झाम) : कोल्हापुरातील संजय घोडावत विद्यापीठातील डीन डॉ. उत्तम जाधव यांनी सेट परीक्षेत यश मिळविले. त्याबद्दल त्यांचा सत्कार विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी केला. यावेळी शेजारी डॉ. एम. टी. तेलसंग, व्ही. व्ही. कुलकर्णी, आदी उपस्थित होते.
===Photopath===
300421\30kol_10_30042021_5.jpg
===Caption===
फोटो (३००४२०२१-कोल-उत्तम जाधव (सेट एक्झाम) : कोल्हापुरातील संजय घोडावत विद्यापीठातील डीन डॉ. उत्तम जाधव यांनी सेट परीक्षेत यश मिळविले. त्याबद्दल त्यांचा सत्कार विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी केला. यावेळी शेजारी डॉ. एम. टी. तेलसंग, व्ही. व्ही. कुलकर्णी,आदी उपस्थित होते.