शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शोभायात्रा मिरवणुकीतून समतेचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 11:45 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज या राष्ट्रपुरुषांच्या ऐक्याचे दर्शन घडविणारी समतेची सम्यक ऐक्य मिरवणूक  दसरा चौकातून उत्साही वातावरणात काढण्यात आली. साथीला पारंपरिक ढोल-ताशा, हलगीचा कडकडाट होता.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शोभायात्रा मिरवणुकीतून समतेचे दर्शनमध्यवर्ती महोत्सव समितीचे आयोजन : संविधानाचा जागर, चित्ररथाने लक्ष वेधले

कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज या राष्ट्रपुरुषांच्या ऐक्याचे दर्शन घडविणारी समतेची सम्यक ऐक्य मिरवणूक  दसरा चौकातून उत्साही वातावरणात काढण्यात आली. साथीला पारंपरिक ढोल-ताशा, हलगीचा कडकडाट होता.

ही मिरवणूक डॉ. बाबासाहेबांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले यांचा जयघोष करण्यात आला.आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता दसरा चौकातून या मिरवणुकीचा प्रारंभ झाला. मिरवणुकीत ढोल-ताशा, लेझिम या वाद्यांसह हलगीच्या कडकडाटात नेते, कार्यकर्ते व महिला डोक्यावर निळे फेटे व गळ्यात निळे स्कार्फ घालून उत्साहाने सहभागी झाले होते.

मिरवणूक दसरा चौकातून सुरू होऊन बिंदू चौक, शिवाजी चौक, भाऊसिंगजी रोड, सीपीआर चौकमार्गे पुन्हा दसरा चौकात येऊन विसर्जित झाली. मिरवणुकीतील अश्वरथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहासनारूढ पुतळा बसविला होता. यासह ‘भारत का संविधान, अर्थात संविधानाचा जागर’ हा फलक, मराठा महासंघातर्फे सामील करण्यात आला होता. विशेषत: या मिरवणुकीतून सामाजिक ऐक्याचे दर्शन झाले.यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष सखाराम कामत, उपाध्यक्ष सुरेश कांबळे, सहसचिव अविनाश शिंदे, जयसिंग जाधव, दगडू भास्कर, प्रा. विश्वास देशमुख, प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, सुखदेव बुदिहाळकर, सुभाष देसाई, अ‍ॅड. पंडित सडोलीकर, मल्हार सेनेचे बबन रानगे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, प्रकाश सातपुते, बाळासाहेब भोसले, भाऊसाो काळे, टी. एस. कांबळे, अविनाश शिंदे, नंदकुमार गोंधळी, आदी सहभागी झाले होते.सायंकाळी सहा वाजता आंबेडकरवादी मान्यवर नेत्यांनी जाहीर सभेत मार्गदर्शन केले, तर सात वाजता ‘वादळ वारा फेम’ अनिरूद्ध बनकर यांचा ‘भीम-बुद्ध’ हा भीम गीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.‘फुले-शाहू-आंबेडकर’ ऐक्याचा देखावामिरवणुकीत एका ट्रॉलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या वेशभूषा केलेले कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्ररथही सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.लक्षवेधी फलकराष्ट्रपुरूषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करू नका, ‘जातिभेद गाढा भारत देश जोडा’ हा फलक अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे मिरवणुकीत सामील करण्यात आला होता. तो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

 

 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीkolhapurकोल्हापूर