अंबपमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:17 IST2020-12-07T04:17:46+5:302020-12-07T04:17:46+5:30
नवे पारगाव : अंबप (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात लोकनियुक्त सरपंच बी. एस. अंबपकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब ...

अंबपमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नवे पारगाव : अंबप (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात लोकनियुक्त सरपंच बी. एस. अंबपकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून महापरिनिर्वाण दिन साजरा झाला. यावेळी उपसरपंच राजेंद्र माने, सदस्य बंडू हिरवे, राधा चिबडे, बाळासाहेब माने, सलमा मुल्ला, सोनाली जाधव, कृष्णात गायकवाड, डॉ. मिलिंद पाटील, वंदना शिंदे, वैशाली झोरे, प्रिया थोरात, माधुरी कांबळे, सागर डोंगरे, सावित्री वाघमोडे, डॉ. ऐश्वर्या पाटील, आदी उपस्थित होते
अंबप येथील बापूसाहेब यशवंत पाटील सहकारी दूध संस्था दूध संस्थेत अंबप वाहनधारक पतसंस्थेचे अध्यक्ष सोमराज सुरेश पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी माजी सरपंच डॉ. बी. के. पाटील, विनय कोरे पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष सुदाम पाटील, संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजवर्धन पाटील, सचिव प्रदीप पाटील, माजी सरपंच संपतराव कांबळे यांच्यासह सर्व संचालक मंडळ व तरुण मंडळ सदस्य उपस्थित होते.
राजेंद्र हायस्कूलमध्ये शिक्षक दिलीप चरणे यांच्या हस्ते आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक के. वाय. पाटील होते. अमोल मंडले, सुनंदा ठवरे, सुनील कांबळे उपस्थित होते.
..................................
फोटो ओळी : अंबप येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात लोकनियुक्त सरपंच बी. एस. अंबपकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.