शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

शेती करायची की, सोडून द्यायची..?, तणनाशक, खतांच्या दरात दुपटीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 13:42 IST

महागाई वाढली की सांगायचे कुणाला, राज्यकर्त्यांना सांगायचे तर ते रशिया-युक्रेनमधील युद्धाकडे बाेट दाखवून रिकामे होतात.

देशात महागाईने कहर केला आहे, त्यातून शेतीही सुटलेली नाही. खते, औषधांच्या किमतीत शेतकरी होरपळून गेला असून, शेती कसायची तर हातात पैसा नाही, साेडायची तर पोराबाळांच्या पाेटात काय घालायचे, असा यक्ष प्रश्न घेऊन शेतकरी शेतीचा गाडा ओढत आहेत. महागाई वाढली की सांगायचे कुणाला, राज्यकर्त्यांना सांगायचे तर ते रशिया-युक्रेनमधील युद्धाकडे बाेट दाखवून रिकामे होतात.युद्ध दाेन परकीय देशांचे, त्याची झळ आपल्या देशातील जनतेला बसू नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारी राष्ट्रप्रमुखाची; पण तेच शेतकऱ्यांना वाऱ्यावर साेडत आहेत, आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या दावणीला शेतकऱ्यांना बांधत आहेत. याचा परिणाम शेतीच्या अर्थकारणावर झाला असून, युद्ध जरी रशिया-युक्रेनमध्ये असले तरी भारतीय शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : कृषिप्रधान देशात स्वातंत्र्यानंतर शेती एवढी आर्थिक आरिष्टात कधीच सापडली नव्हती. सरकार एकीकडे उत्पादनवाढीचा आग्रह धरत असताना दुसऱ्या बाजूला त्यासाठी लागणाऱ्या आनुषंगिक गोष्टीबाबत कमालीची उदासीनता दाखवली जात आहे. गेल्या तीन-चार महिन्यांत कीटकनाशक, तणनाशक व खतांच्या दरात झालेल्या वाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेती करायची की सोडून द्यायची, अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

आधुनिक शेतीकडे वळत असताना शेतीचा खर्चातही मोठी वाढ झाली आहे. शेतात राबणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने यांत्रिकीकरण आले असले तरी त्यासाठी लागणारा खर्च काही कमी नाही. भांगलण करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने तणनाशकांचा वापर करावा लागत आहे. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांत तणनाशकांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर खतांनी मोठी झेप घेतली असून, बहुतांशी खतांचे दर १५०० रुपयांच्या पुढे आहेत. याचा एकत्रित परिणाम शेतीच्या अर्थगणितावर झाला आहे.महागडी खते घालून उत्पादन किती घ्यायचे, असा प्रश्न आहे. त्याचबरोबर सोन्याच्या किमतीचे खते व तणनाशकांचा वापर करून पिकवलेले पीक काढणीपर्यंत टिकेल का, टिकले तर बाजारात योग्य भावात विकेल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शेतकऱ्यांकडे नाहीत. या सगळ्या कारणांमुळे शेती आतबट्ट्यात आली आहे.

तणनाशकांच्या दरात झालेली वाढ -

तणनाशक               पूर्वीचे दर    आताचे दरग्लॅफोसेल (१०० ग्रॅम)     ७०            १४०२-४ डी ५८ (१ लिटर)   ३२०          ४२०पॅराप्युले २४ (१ लिटर)    ३२०         ४२०मेट्रीबिझोन (१०० ग्रॅम)    १२०          १८०ॲट्रॉझिऑन (५०० ग्रॅम)   १५०         २२०

खते                   पूर्वीचा दर    आताचा दर प्रति पोते

सुफला -             ११७५         १५००१०:२६:२६         ११८०         १४७०१८:१८:१०         १०२५         ११९०पाेटॅश                १०६०         १७००अमोनियम सल्फेट   ८००           ११००डीएपी               १२००          १३५०एस. एस. पी.        ३००           ४५०

शेतीला इतके वाईट दिवस कधीच आले नव्हते. खते, बियाणे, वीज सगळ्यांची दरवाढ झाली. मात्र, आमच्या पिकांना हमीभाव नाही. आतबट्ट्यातील शेतीकडे नवीन पिढी येणार नाही. - सर्जेराव पाटील (शेतकरी, गडमुडशिंगी)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीInflationमहागाई