दुबार २,८४१ नावांमुळे वाढली पॉझिटिव्ह रूग्णसंख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:26 IST2021-07-30T04:26:26+5:302021-07-30T04:26:26+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या दुसऱ्या लाटेतील पॉझिटिव्ह रूग्णांच्या यादीमध्ये तब्बल २ हजार ८४१ ...

दुबार २,८४१ नावांमुळे वाढली पॉझिटिव्ह रूग्णसंख्या
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या दुसऱ्या लाटेतील पॉझिटिव्ह रूग्णांच्या यादीमध्ये तब्बल २ हजार ८४१ नागरिकांची नावे दुबार आल्यामुळे जिल्ह्याची एकूण रूग्णसंख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. ही नावे आता कमी करण्यात आली आहेत. यात सर्वाधिक नावे ही कोल्हापूर शहरातील आहेत.
गेल्या १५ दिवसांपूर्वीपासून आयसीएमआरच्या वेबसाईटवरील कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी आणि जिल्ह्यातील आकडेवारी यामध्ये फरक जाणवत होता. याबाबत नेमकी आकडेवारी कुठे चुकते, याची माहिती घेतली जात होती. अशावेळी कोल्हापूर जिल्ह्याच्या यादीमध्ये २ हजार ८४१ जणांची नावे दुबार असल्याचे लक्षात आले. ही सर्व नावे आयसीएमआरने वेबसाईटवरून काढून टाकली आहेत.
ही सर्व नावे खात्री झाल्यानंतर काढून टाकली असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील साथरोग सर्वेक्षण विभागानेही ही नावे आता यादीतून काढून टाकली आहेत. त्यामुळे कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या एकदम २,८४१ नावांनी कमी झाली आहे.
चौकट
नावे दुबार झाली कशी
अनेकदा नागरिक अन्टिजन चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह येत. पुन्हा खात्री करण्यासाठी ते खासगी प्रयोगशाळेमध्ये जात. तेथे आधी चाचणी केल्याचे सांगितले नाही तर पुन्हा नव्याने चाचणी होऊन त्या पॉझिटिव्ह अहवालाच्या आधारे पुन्हा संबंधिताचे नाव पॉझिटिव्हच्या यादीत समाविष्ट होत होते. त्यामुळे ही संख्या वाढत गेल्याचे सांगण्यात आले.
कोट
नागरिकांनी एकदा सोडून दोनदा कोरोना चाचण्या करून घेतल्या. एका ठिकाणची माहिती दुसऱ्या ठिकाणी दिली नाही, असेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत ही दुबार नावे यादीमध्ये आली. ती आता खातरजमा करून काढून टाकण्यात आली आहेत.
- अनिल माळी, जिल्हा शल्य चिकित्सक
चौकट
अ.न. तालुका/नगरपालिका दुबार वगळलेली नावे
१ आजरा ७५
२ भुदरगड ३१
३ चंदगड ३३
४ गडहिंग्लज ७६
५ गगनबावडा ०४
६ हातकणंगले ३१२
७ कागल ११७
८ करवीर ५२२
९ पन्हाळा १६०
१० राधानगरी ९२
११ शाहूवाडी ९७
१२ शिरोळ १६१
१३ इचलकरंजी न. पा. ८४
१४ जयसिंगपूर ३८
१५ कुरूंदवाड ००
१६ गडहिंग्लज ८
१७ कागल २०
१८ शिरोळ ०७
१९ हुपरी ०७
२० पेठ वडगाव १४
२१ मलकापूर ००
२२ मुरगुड ०५
२३ कोल्हापूर महापालिका ९४२
२४ इतर जिल्हे ३६
एकूण २८४१