शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

जीबी सिंड्रोम'साठी सव्वा लाखाचा डोस, कोल्हापुरातील सीपीआरमधून आतापर्यंत २२ रुग्णांना दिली मोफत इंजेक्शन्स

By समीर देशपांडे | Updated: March 4, 2025 17:09 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : जीबी सिंड्रोमच्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सीपीआरमध्ये दाखल झालेल्या २२ रुग्णांना आतापर्यंत ४४ लाख २० हजार ...

समीर देशपांडेकोल्हापूर: जीबी सिंड्रोमच्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सीपीआरमध्ये दाखल झालेल्या २२ रुग्णांना आतापर्यंत ४४ लाख २० हजार रुपयांची इंजेक्शन्स मोफत दिली आहेत. यासाठीचा आवश्यक तो साठा सीपीआरमध्ये करण्यात आला आहे.जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या रुग्णाचे हात, पाय शक्तिहीन होतात. प्रतिकारशक्ती कमी झालेल्या नागरिकांना याची लागण होऊ शकते. कधी-कधी पक्षाघातही होऊ शकतो, तर मेंदूवरही त्याचा परिणाम हाेऊ शकतो. पुण्यामध्ये जानेवारीमध्ये अनेक जणांना लागण होऊन काहींचा मृत्यूही झाला होता. एकाच भागातील रुग्णांना हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर, अनेक जिल्ह्यातून अशा रुग्णांच्या बातम्या येऊ लागल्या.कोल्हापूर जिल्ह्यात १ जानेवारी ते ३ मार्च २०२५ पर्यंत २२ जणांना जीबी सिंड्रोमची लागण झाली आहे. यावर जालीम उपाय म्हणजे आयव्ही इम्युनोग्लोब्युलिनचा डोस रुग्णाला दिला जातो. त्या रुग्णाच्या वजनाप्रमाणे एकदाच हा डोस द्यावा लागतो. या डोसची ५ ग्रॅमच्या कुपीची किंमत १० हजार रुपये आहे. म्हणजे जर ७० किलो वजनाचा रुग्ण असेल, तर त्याला तब्बल १ लाख ४० हजार रुपयांचा डोस द्यावा लागतो आणि त्यानुसार हे डोस दिलेही जात आहेत. आतापर्यंत या सर्व रुग्णांना ४४२ कुपी डोस देण्यात आले आहेत. याची किंमत तब्बल ४४ लाख २० हजार रुपये इतकी होते, तसेच या रुग्णांना प्लाज्माही द्यावा लागतो, तोही आवश्यक प्रमाणात देण्यात आला आहे.

फिजिओथेरपीची सोयजीबीच्या रुग्णांना गरज भासल्यास व्हेंटिलेटर लावावा लागतो. त्यामुळे त्यांना न्युमोनियाही होण्याची शक्यता असते. हातापायातील शक्ती गेल्याने अनेक वेळा त्यांना उपचारानंतर फिजिओथेरपीची गरज भासते. अनेक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांना बाहेरची ही सेवा परवडत नाही. सीपीआरमध्ये यासाठी सुसज्ज यंत्रणेसह दोन कक्ष असून, पूर्णवेळ या ठिकाणी फिजिओथेरपी केल जाते. जीबीच्या रुग्णांना छातीसाठी फिजिओथेरपी करावी लागते. ती या ठिकाणी मोफत करण्यात येत आहे.

तब्येत दाखवण्यासाठी आलेल्या काही रुग्णांची लक्षणे पाहिल्यानंतर आणि तपासणीनंतर जानेवारी २५ पासून २२ रुग्ण सीपीआर रुग्णालयात दाखल झाले. या सर्वांना अत्यावश्यक अशी ४४ लाख रुपयांची इंजेक्शन्स मोफत देण्यात आली आहेत, तसेच फिजिओथेरपीही केली जात आहे. - डॉ.एस.एस. गुरव, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय